उल्हासनगर येथे किन्नरांच्या हक्कासाठी सारा फ़लक, मेरा हक़ किन्नर समाजाला शिक्षण देण्याकरिता राज्य सरकार मदत करणार .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : वान्या फाउंडेशन आणि किन्नर अस्मिता संस्था यांच्या वतीने अल्पसंख्यांक दिवसाचे औचित्य साधत   उल्हासनगर कॅंप  ३ येथिल  रिजंसी  हॉल मध्ये   किन्नर मित्रा करिता  सारा फ़लक, मेरा हक़ " या नावाने  संस्कृतिक कार्यक्रम,  फैशन शो, डांस आणि  गायन स्पर्धाचे  आयोजन करन्यात आले होते . हा  उल्हासनगर  मध्ये होणारा पहिला कार्यक्रम होता . या कार्यक्रमात उल्हासनगर कल्याण अंबरनाथ येथिल  असंख्य  किन्नरानी सहभाग घेतला होता . 

उल्हासनगर येथे किन्नरांच्या न्याय हक्का करिता लढणाऱ्या वान्या फाऊंडेशन व किन्नर अस्मिता संस्था यांच्या वतीने सारा फलक मेरा हक . या नावाने एका संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले होते . या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मंत्रालय  शिक्षण विभाग आणि किन्नर   विकास मंडळ  विभागा  चे   अधिकारी  राजेश गुंजाळ  आणि  प्रशांत डांगे यानी  राज्य सरकार कडुन या  किन्नर बांधवांच्या विकासा करिता  शासना च्या काही योजना आहेत त्या योजना बाबत माहीती दिली .  ७ वी पास असलेल्या किन्नराना पदवीधर पर्यंत शिक्षण देन्याची माहीती देन्यात आली तर पुढील कार्यक्रम हा काही मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असुन असे आश्वासन मुजरा नानी याना देन्यात आले आहे . या कार्यक्रमात आमदार कुमार आयलानी . उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम . वाहतुक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे.  किन्नर विकासात पुढे असलेली हमसफर ट्रस्ट चे पदाधिकारी यानी उपस्थित राहुन या किन्नर बांधवाचे मनोबल वाढवले . 

दरम्यान मिस टीजी २०१८ चा किताब जिंकणारे  नाव्या सिंग आणि  टीजी आयकॉन कल्याण प्रमुख आकर्षण होते . तर प्रसिध्द लावणी डांसर विद्यासागर देडे यानी उत्कृस्ट नृत्य सादर केले . हा कार्यक्रम यशस्वी करन्या करिता सी एच एम कॉलेज . वान्या फाऊंडेशन . व त्यांच्या पदाधिकारी यानी मेहनत घेतली . तर सुत्र संचालन किन्नर अस्मिता ची पदाधिकारी तमन्ना केणे यानी केले .

संबंधित पोस्ट