पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवले बोगस शेतकरी प्रमाणपत्रावर जमीन हडपु प्रकरण .
- by Rameshwar Gawai
- Dec 20, 2020
- 1254 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शेजारी असलेल्या कांबा. वाघेरे पाड़ा,व वरपगांव परिसरातील आदिवासी गरीब शेतकऱ्यांच्या जमीनी हड़प करणाऱ्या प्रकरणाला नवीन वळण लागले असुन शासनाने ठाणे जिल्हाधिकारी यांच्या कडे असलेले हे प्रकरण काढुन आता पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे सुपूर्द केल्याने आता आदिवासी ना न्याय मिळणार आहे .
उल्हासनगर शेजारी असलेल्या वरप कांबा येथिल वाघेर पाडा या परिसरातील गरीब आदिवासी यांच्या जमीन बोगस शेतकरी प्रमाणपत्राच्या आधारे उल्हासनगर येथिल भुमाफिया यानी हडप केल्या आहेत . तेव्हा हे प्रकरण ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे होते .परंतु या प्रकरणात नार्वेकर यानी आदिवासी याना न्याय दिला नाही . म्हणुन शासनाने हे प्रकरण आता पालघर जिल्हाधिकारी यांच्या सुपूर्द केले आहे . त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी प्रशासन हतबल झाले आहे . दरम्यान आता आदिवासी यांच्या जमीनी बाबत पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडुन कसुन चौकशी होणार असल्याने भुमाफियाना पाठीशी घालणारे कल्याण प्रांत अधिकारी व तहसिलदार यांच्या वर कारवाई होन्याची शक्यता आहे .
या गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या बाजुने लढणारे परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी या बोगस शेतकरी प्रमाणपत्रा च्या प्रकरणात शेकडो पुरावे देवुन शासनांच्या निदर्शनास आणुन दिले आहे . की ह्या जमीन आदिवासी यांच्या आहेत . परंतु स्थानिक तहसिलदार . प्रांत अधिकारी व जिल्हाधिकारी प्रशासन यानी राष्ट्रिय अनुसूचित जाती जमाती आयोग व राज्य शासनाच्या संबधित विभागाला चुकीची माहीती देवुन त्यांची दिशाभुल केली आहे .दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशना मध्ये शासनाने ठाणे जिल्हाधिकारी यांच्या कडुन अहवाल मांगवला . परंतु ठाणे जिल्हाधिकारी प्रशासनाने चुकीचा अहवाल सादर करुन अधिवेशनात शासनाची दिशाभुल केली . दरम्यान या प्रकरणात आदिवासी यांच्या हक्का करिता लढणारे संस्थाचे अध्यक्ष विशाल कुमार गुप्ता यानी दिलेले दस्ताऐवज यांच्या वर विचार करुन राष्ट्रीय आयोग व राज्य सरकार च्या गुप्तचर विभागा कडुन राजस्व विभागाला पुरावे सादर केल्याने सदर विभाग सतर्क होवुन कारवाई करन्यास तयार झाले . तर कोकण विभागीय आयुक्त यांच्या कडुन आदिवासी जमीन हडपु प्रकरणात ठाणे जिल्हाधिकारी याना हटवुन पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे सोपवन्यात आले आहे .
या प्रकरणात राजस्थान येथिल जिल्हा सिरोही, तहसील शिवगंज, गांव मनादर या स्थानिक प्रशासना ने आपल्या अहवालात म्हटले आहे की प्रकाश रेवाचंद बुधरानी नावाचा व्यक्ती हा येथिल रहिवासी नसुन तो शेतकरी सुध्दा नाही .मात्र या बोगस शेतकरी प्रमाणपत्राच्या आधारे जमीन हडप केल्या प्रकरणात मुख्य आरोपी भूमाफिया प्रकाश रेवाचंद बुधरानी व त्याच्या परिवारातील निशा ,गिरीश,विशाल आणि शीतल व इतर यांच्या विरुध्द कल्याण तालुका टिटवाला पुलिस स्टेशन मध्ये अलग अलग दोन गुन्हे दाखल झाले आहेत .तर या भूमाफियाना मदत करणारे ठाणे जिल्हाधिकारी यांच्या विरुध्द शासनाच्या गुप्तचर विभागाच्या माहीती नुसार हे प्रकरण ठाणे जिल्हाधिकारी यांच्या कडुन काढुन पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे सोपवन्यात आले आहे . त्यामुळे आता आदिवासी शेतकऱ्याना न्याय मिळणार आहे तर हे प्रकरण पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे सोपवल्याने ही ठाणे जिल्हाधिकारी याना एक प्रकारे चपराकच बसली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम