शेषराव वाघमारे यांची वंचित बहुजन आघाडीच्या उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती .
- by Rameshwar Gawai
- Dec 15, 2020
- 499 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडी ने जुन्या कार्यकरण्या बरखास्त केल्या असुन नवीन कार्यकरण्या निवडन्याची प्रक्रिया सुरु करन्यात आली आहे . तेव्हा उल्हासनगर मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शहर जिल्हा अध्यक्ष पदी शेषराव वाघमारे यांची नियुक्ती करन्यात आली आहे . तर या पुर्वी देखिल वाघमारे हे अध्यक्ष पदावर होते . शेषराव वाघमारे हे गेल्या (१९८५) वर्षापासून भारिप मध्ये सक्रिय कार्यकर्ते होते त्यांनी आतापर्यंत भारिप ते आता वंचित बहुजन आघाडी या पक्षात ते ३५ वर्षापासून काम करीत आहेत त्यांनी विविध पदावर कामे केली आहे त्यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्षपदाची धुरा शेषराव वाघमारे यांना सोपविण्यात आली असून वंचित बहुजन आघाडीने माझ्यावर विश्वास दाखवून पदभार दिला म्हणून मी पक्षाचा आभारी आहे या पुढे पक्षाची जी जबाबदारी माझ्यावर सोपविली ती मी स्वीकारण्यास तयार आहे अशी प्रतिक्रिया उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे यांनी दिली असून उल्हासनगर -४ मध्ये वंचित चे नेते सारंग थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयात शेषराव वाघमारे यांची उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करताना सारंग थोरात . किशोर पाटील . यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते तर भारतीय बौध्द महासभा यांनी . वाघमारे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम