उल्हासनगर महापालिकेने कचरा उचलणाऱ्या कोणार्क कंपनीला दिली नोटीस .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलन्याचे काम कोणार्क कंपनीला दिले आहे . परंतु या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्याना पगार न दिल्याने त्या कर्मचाऱ्यानी संप पुकारला होता तेव्हा या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने शहरात दुर्गंदी पसरली असुन हा कचरा अखेर महापालिकेला उचलावा लागल्याने महापालिकेने त्या कोणार्क कंपनीला अखेर नोटीस बजावुन खुलासा मांगवला आहे . 

उल्हासनगर महापाकिकेने शहरातील कचरा  झिरो गारबेज या तत्वावर उचलण्याचा ठेका येथिल प्रसिध्द कोणार्क कंपनीला दिला असुन हा कचरा उचलन्याचे मुल्य दररोज ४ लाख ४६ हजार रुपये इतके असुन महापालिका दर महिन्याला या कंपनीला १५ कोटी रुपये देते  . कोरोना च्या प्रादुर्भावाने महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे तीन महिन्या पासुन महापालिकेने कोणार्क कंपनीला पैसे अदा केले नाहीत . त्यामुळे या कोणार्क कंपनी ने आपल्या ५५० कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्याना वेतन दिले नाही . वेतन न मिळाल्याने हे कर्मचारी कंपनीवर नाराज होते.त्यामुळे या कर्मचाऱ्यांची बाजु घेवुन लढणारे संघर्ष  कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदिप गायकवाड यानी या कर्मचाऱ्याना घेवुन संप पुकारला होता . या संपामुळे शहरात कचऱ्याचे ढिग साचलेले असताना अखेर महापालिकेला जे सी बी व डंपर लावुन कचरा उचलावा लागला . त्यामुळे महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यानी कोणार्क कंपनीला नोटीस पाठवुन खुलासा मागवला आहे .

संबंधित पोस्ट