
भीम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद यांचा वाढदिवस रक्तदान करुन साजरा.
- by Rameshwar Gawai
- Dec 04, 2020
- 1547 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे स्वाभीमानी व्यक्तिमत्त्व भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांचा वाढदिवस उल्हासनगरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक जाणीवेतून विविध उपक्रम राबवत कोरोना संकटात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तर या वेळी समाजातील उपेक्षित व कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.चंद्रशेखर आझाद रावण यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला तेव्हा ऑनलाईनच्या माध्यमातून चंद्रशेखर आझाद रावण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला भारतीय संविधानाच्या उद्देशावर पक्ष देशात काम करत असून जातीमुक्त समाज निर्माण करण्याचे काम भीम आर्मी करत आहे . असं भीम आर्मी संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षा नेहाताई शिंदे यांनी सांगितले भीम आर्मीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष कुमार पंजवानी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी भीम आर्मी चे नेहा ताई शिंदे,राजेश गवळी, मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे, डॉ.जाफर तडवी, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक दिलीप मालवणकर यांच्या सह भीम आर्मी चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम