
उल्हासनगरात जागतिक दिव्यांग दिन उत्सवात साजरा .
- by Rameshwar Gawai
- Dec 04, 2020
- 1176 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल अपंग आधार सेवा संस्थेच्या वतीने जागतिक अपंग दिन मोठ्या उत्साहात साजरा करन्यात आला . या कार्यक्रमाला विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते . त्यानी दिव्यांग बंधु याना मोलाचे मार्गदर्शन करुन सर्वांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या.नंतर दिव्यांग बांधवानी एकत्रित स्नेहभोजनाचा लाभ घेवुन सर्वांचा आनंद द्विगुणित केला .या कार्यक्रमाचे आयोजन लोकहित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद जी. बाऱ्हे,
सोशल वर्कर ग्रुपचे अध्यक्ष निलेश सी. जाधव यांनी केले होते .या कार्यक्रमाला समाज विकास संस्थे चे अध्यक्ष रुपेश ससाणे, असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्या अध्यक्षा मीरा सपकाळे , आरोग्यंम् धनसंपदा फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षा साक्षी डोळस, पत्रकार अशोक शिरसाठ, सुखनंदन गवई, गायक विकास कांबळे, मुकेश जाधव, विलास गंगावणे, सुरेश उमप, विकी तरे आदी मान्यवर व दिव्यांग जन, बबलु बेहेनवार, बाळू महानुभव, सुनिल नायकर, रमाकांत सुतार, विनोद उघडे, विजय सावंत, सपना गवारे, अनिल नितनवरे, सुधाकर खैरनार, अमृत हन्सोरा, गणेश बिजबिरे, विकास बर्वे यांच्या सह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम