शहापूर येथे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २००० शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन

शहापुर(महेश धानके) आज ३ डिसेंबर रोजी देशभरातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देब्यासाठी आणि भाजपच्या मोदी सरकारच्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांवरील अमानुष दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात शहापूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय व सीटू यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली २०००हून अधिक लोकांनी शहापूर एसटी स्टँडवरून मोर्चा काढला, शहापूरच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या पंचायत समितीसमोर जोरदार रस्ता रोको आंदोलन केले आणि तहसील समोर उग्र निदर्शने केली. 

भाजपचे मोदी सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकारने केलेले शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी कायदे मागे घ्या, वीज विधेयक मागे घ्या, सर्व शेतकरी-शेतमजुरांची कर्जमुक्ती करा, सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्या, वनाधिकार कायद्याची कसून अंमलबजावणी करा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, तसेच शहापूर तालुक्यातील नेते भरत वळंबा, कृष्णा भावर, सुनील करपट,विजय विशे, नितीन काकरा, भास्कर म्हसे, सुनीता ओझरे, निकिता काकरा, कमल वळंबा,   इत्यादींनी केले.

संबंधित पोस्ट