
पगार मागितला म्हणून कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावुन जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालका वर गुन्हा दाखल .
- by Rameshwar Gawai
- Dec 03, 2020
- 893 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी थकीत पगार मागितला म्हणून कर्मचाऱ्यांवर खुर्ची उगारुन त्यांना दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल तुळशीराम वायले यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना गेल्या ५ महिन्यापासुन पगार मिळाला नाही म्हणून दि.२६-११-२०२० रोजी समितीचे सभापती रविंद्र राऊत यांनी कर्मचाऱ्यांना चर्चे साठी बोलविले होते त्यावेळेस सर्व कर्मचाऱ्यांनी थकीत पगाराची मागणी केली असता,उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांनी कर्मचाऱ्यांवर खुर्ची उगारुन दमदाटी करुन जिवे मारण्याची दिली म्हणून उल्हासनगर येथिल विठ्ठलवाडी पो.स्टे.मध्ये विनोद भगवान पाटील नामक कर्मचाऱ्यांने तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरुन अनिल वायले यांचेवर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दरम्यान या तक्रारीचा राग मनात धरुन अनिल वायले यांनी विनोद यास तु समितीच्या कामावर येतो कसा ते पाहतो अशी धमकी दिल्याबाबत तसेच अनिल वायले हे नेहमीच समितीच्या कार्यालयात व तपासणी नाक्यावर येऊन कर्मचाऱ्यांना त्रास देत असुन त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या आशयाची लेखी तक्रार पोलीस आयुक्त ठाणे यांना देन्यात आली आहे .
सदरचे संचालक हे मुजोर व उर्मट असुन ते महिला कर्मचाऱ्यांशीही उद्धट व उर्मटपणे वागत असतात असेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
कृषी उत्पन्न बाजार सामितीच्या सत्ताधारी संचालकानी संगनमत करुन एका जमीन व्यवहारात कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार केला असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे .संचालक मंडळाने खरेदी केलेल्या बाबतही शेतकऱ्यांनी न्यायालयात दावे दाखल केलेले आहेत.सदरची जमिन समितीच्या ताब्यात नसतांनाही सत्ताधारी संचालक मंडळाने जमिनीची संपूर्ण रक्कम अदा करुन भ्रष्टाचार केल्याचीही माहीती कर्मचाऱ्यांनी दिली.सद्यस्थितीत समितीकडे उपलब्ध असलेल्या पैशातुन कर्मचाऱ्यांचे पगार व देणगी देण्यासाठी राखीव ठेवण्यात येऊन संचालक मंडळास कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशा स्वरुपाचे पत्र देखिल सर्व कर्मचाऱ्यां मार्फत महाराष्ट्र शासनाकडे दिले असल्याचे समजते.संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नेमणूक करण्यात यावी अशीही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
सदरचे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश ही महाराष्ट्र शासनाकडुन आले असतांनाही ठाणे जिल्हाचे डी डी आर यांनी सदरचे मंडळ बरखास्त का केले नाही.याबाबत डी डी आर बाबत ही शंका उपस्थित केली जात आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम