राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाच्या निमित्ताने उल्हासनगरात कार्यशाळेचे आयोजन.

उल्हासनगर(प्रतिनिधी) : दर वर्षी  २ डिसेंबर रोजी  देशभरात  'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' साजरा करन्यात येतो हा दिवस साजरा करन्याचे उद्देश एकच असतो तो म्हणजे  औद्योगिक क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण यांची जनजागृती करणे .सोबतच   हवा, पानी आणि  माती याना प्रदुषणा पासुन वाचवणे या साठी विविध स्थरावर समाजात जनजागृती करण्या करिता हा दिवस साजरा करन्यात येतो .

उल्हासनगर येथिल  शैक्षणिक संस्था सिंधु एज्युकेशन सोसायटी, हिराली फाउंडेशन, वृक्ष फाउंडेशन आणि वान्या फाउंडेशन यांच्या वतीने  स्वामी हंसमुनि कॉलेज येथे हा दिवस साजरा करन्यात आला असुन या दिवसा निमित्ताने  एका कार्यशाळेचे आयोजन करुन   विद्यार्थ्याना ' राष्ट्रिय प्रदुषण नियंत्रण दिवस ' साजरा का करतात या बाबतची माहीती देण्यात आली .  या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे  उल्हासनगर ट्रॉफिक विभागाचे   पोलिस निरीक्षक   श्रीकांत धरणे यांच्या हस्ते   दीप प्रज्वलित करुन  उद्घाटन करन्यात आले . तर त्यानी वाहनातुन होणारे   प्रदूषण आणि त्यांच्या पासुन बचाव कसा करायचा या बाबत माहीती दिली तर  हिराली फाउंडेशनच्या  अध्यक्षा  सरिता खानचंदानी , वृक्ष फाउंडेशनच्या अध्यक्षा   ज्योती तायडे , पर्यावरण मित्र आश्विन अघोर, सरिता पाटील सुभजित मुखर्जी, स्मिता भोसले , चंदन तिलोकानी यांच्या द्वारे  विद्यार्थ्याना   प्रदूषण नियंत्रणा बाबत योग्य ती माहीती देण्यात आली .

या वेळी वान्या फाउंडेशनच्या  प्रमुख रेखा ठाकुर यानी सांगितले की   सर्व  मंदिर  गुरुद्वार या मधुन  फूल निर्माल्य जमा करुन  त्यांच्या पासुन  अगरबत्ती बनवन्याचे काम सुरु करन्यात येणार आहे.तर  किन्नर मित्र व इतर गरजु  महिलाना   प्रशिक्षण देण्याचे  रोजगार निमित्ताने करण्यात येणार आहे .

संबंधित पोस्ट