
बँटरी चोरच निघाला मोटरसायकल चोर. सहा मोटरसायकल सह आरोपी जेरबंद.
- by Rameshwar Gawai
- Dec 01, 2020
- 799 views
उल्हासनगर(प्रतिनिधी): विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा मोटरसायकल व १२ बँटरी सह आरोपी फिरोज शेखला पोलीसांनी अटक केली आहे.उल्हासनगर कॅंप ४ येथिल विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकलच्या बॅटरी चोरी जात असल्याच्या बऱ्याच तक्रार आल्या होत्या तेव्हा या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीसांना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की संशयित आरोपी हा माणेरे गाव, मोर्या नगरी उल्हासनगर ४ येथे येणार असल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत यानी आपले सहकारी पो.ना.रोहित बुधवंत,पो.हा .नाना मोरे पो.शि.समिर गायकवाड, पाटील ,कुणाल शेकडे,योगेश सानप,मंगेश विर या पोलीसांनी संशयित आरोपी फिरोज शिकंदर शेख (वालधुनी कल्याण) याला पकडून त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे १२ मोटरसायकल च्या बँटऱ्या आढळून आल्या आहेत. तर त्याने तब्बल ६ मोटरसायकल चोरल्याचे ही कबुल केले असून त्याच्या कडील सहा मोटरसायकल पोलीसांनी जप्त केल्या आहेत . या गुंह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम