ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर याना धमकावणाऱ्या शिवसैनिकांचा निषेध
- by Rameshwar Gawai
- Dec 01, 2020
- 945 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे ओमी कलानी यांच्या भेटीला त्यांच्या बंगल्यावर गेले असता त्यानी प्रोटोकॉल प्रमाणे कलानी बंगल्यावर जायला नको होते अशी एक पोष्ट ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर यानी समाज माध्यमावर व्हायरल केली होती . तेव्हा या पोष्ट वरुन शहरातील शिवसैनिक संतप्त झाले . आणि ६० ते ७० शिवसैनिक मालवणकर यांच्य घरी जावुन त्याना धमकावण्याचा प्रयत्न केला . मात्र शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या समंजस भुमिके मुळे पुढील अनर्थ टळला . दरम्यान ज्येष्ट पत्रकाराच्या घरी जावुन त्याना धमकावुन शिवीगाळ करणे हे कितपत योग्य आहे या बाबत शहरात उलट सुलट चर्चा होत असुन या घटनेचा सर्व पत्रकार संघटना नी निषेध व्यक्त केला आहे .या बाबत माहीती देताना दिलीप मालवणकर यानी सांगितले की काल माझ्या घरी ६० ते ७० शिवसैनिक आले होते. खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भातील पोस्ट बाबत रोष व्यक्त करण्यासाठी. एखाद्या पत्रकाराने प्रामाणिकपणे लिहिलेल्या बातमीबद्धल ६० ते ७० लोकांनी त्याच्या घरी चाल करून जाणे, धमकावणे व शिवीगाळ करणे लोकशाही व पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणेच आहे. खासदार किंवा शिवसेनेने यावर आपली प्रतिक्रिया दिली असती तर ते उचित ठरले असते.
जर आपली बदनामी झाली असे खासदारांना वाटले असेल तर ते अब्रू नुकसानीचा दावा ही करू शकले असते. परंतू तसे न करता माझ्या घरात घुसून जी दडपशाही केली ती निषेधार्ह आहे. मला अनेक हितचिंतकांचे फोन आले रितसर गुन्हा नोदविण्याचे सुचविले, अनेक पक्ष संघटनांनी आंदोलनाची तयारी दर्शवली. परंतू माझे शिवसैनिकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, यातील अनेक लोक तर पक्षाचा आदेश म्हणून नाईलाजाने आले होते. राजन वेलकर या दलबदलूने मला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.मी ही त्यास सडेतोड उत्तर दिले. हा आगाऊ बाटगा निष्ठेचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करीत होता.मी ट्रेस पासिंग व खूनाच्या धमकीचा गुन्हा नोंदवून त्याला अद्दल घडवू शकतो.परंतू इतर समंजस व माझा आदर करणारे शिवसैनिक ही अडचणीत आले असते, म्हणून मी संयम बाळगला आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी व उपशहर प्रमुख राजेंद्र शाहू यांनी सामंजस्यपूर्ण भूमिका घेऊन पुढील अनर्थ टाळला.
सदर घटना सर्वथा चुकीची आहे. एका ज्येष्ठ पत्रकाराच्या घरावर अशाप्रकारे जमाव पाठवून दबाव आणण्याचा प्रयत्न करणे लोकशाही , वृत्तपत्र व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. याचा मी तीव्र निषेध करुन या विषयावर पडदा टाकत आहे. असे मालवणकर यानी सांगितले .तर या घटनेचा अन्याय विरोधी संघर्ष समिती . पत्रकार सुरक्षा समिती. रोड रोलर चालक संघटना यानी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम