मध्यवर्ती रुग्णालय परिसरात खड्यांचे साम्राज्य, रुग्णांचे हाल.

उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालय परिसरात रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत ज्यामुळे रुग्णांना चालण्यास देखील त्रास सहन करावा लागतो त्याचप्रमाणे वाहनचालकांसाठी देखील रस्ता धोकादायक झाला आहे . या संदर्भात नगरसेविका सविता तोरणे - रगडे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदना  द्वारे तक्रार करून लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे . 

उल्हासनगरचे मध्यवर्ती रुग्णालय हे शासकीय रुग्णालय असून या रुग्णालयात  उल्हासनगर मधीलच नव्हे तर  शहराच्या आजूबाजूच्या शहरातील आणि ग्रामीण भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात यामुळे सतत येथे रुग्णांची वर्दळ असते , परंतु रुग्णालयात प्रवेश करताच रुग्णालयाच्या आतील रस्ते, ओपीडी पासून ते शवविच्छेदन गृह आणि रुग्णालयाच्या मागील भागापर्यंत पूर्णपणे उखडून गेलेले  आहेत  . त्यामुळे रुग्णांना येथून वावरणे वेदनादायक झाले आहे.  शिवाय रिक्षा , रुग्णवाहिका आणि मोटारसायकलसाठी रस्ता धोकादायक झाला आहे. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नेहमीच असते . 

या संदर्भात टीओके पक्षाच्या नगरसेविका सविता तोरणे - रगडे व समाजसेवक शिवाजी रगडे  यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली असून लवकरात लवकर हा रस्ता बनविण्यात यावा अशी मागणी केली आहे . 

मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य  चिकित्सक  डॉ सुधाकर शिंदे यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले  आम्ही यासंदर्भात अनेकदा महाराष्ट्र शासनाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे, रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १९  लाख रुपयांची निविदा देखील काढलेली आहे ,  मात्र गेल्या ७  महिन्यां पासून कोव्हीड - १९ ची परिस्थिती सुरू असल्यामुळे कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही. लवकरच कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे .

संबंधित पोस्ट