सभापतींच्या पदाचा आणि खुर्चीचा सभापतीच्या दिरा कडुन गैरवापर .

उल्हासनगर(प्रतिनिधी)  : उल्हासनगर महापालिकेच्या  प्रभाग समिती २  च्या सभापती शुभांगीनी  निकम यांच्या आसनावर बसून चक्क त्यांचा दिर कमलेश निकम यांनी बैठक आयोजित केली . 

काल दुपारी १  वाजताच्या सुमारास प्रभाग समिती २  मध्ये पाणीपुरवठा व अन्य विषयावर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रभाग समिती २  च्या सभापती म्हणून नुकत्याच निवडून आलेल्या टी ओ के पक्षाच्या नगरसेविका शुभांगीनी  निकम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होणे अपेक्षित होते , मात्र त्यांच्या आसनावर चक्क त्यांचे दिर टीओके पक्षाचे नेते यांनी ताबा घेतला . या बैठकीला सहायक  आयुक्त भगवान कुमावत  देखील व अन्य महापालिका  कर्मचारी आणि काही राजकीय नेते उपस्थित होते . 

या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत , कमलेश निकम यांचे हे वर्तन असंवैधनिक असून त्यांनी आसनाचा गैरवापर केल्याचे आरोप त्यांच्यावर होऊ लागले आहेत .    

याप्रकरणी, आयुक्तांनी चौकशी करून कमलेश निकम आणि बेजबाबदार प्रभाग अधिकारी कुमावत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा प्रवक्ता मनोज लासी यांनी केली आहे.

मी सभापतीच्या आसनावर बसलो नव्हतो, माझ्या वहिनीला बैठकीला येण्यास उशीर झाला म्हणून त्याचा प्रतिनिधी म्हणून मी औपचारिक रित्या चर्चा करीत होतो, यात कोणत्याही पदाचा किंवा अधिकाराचा गैरवापर केला नसल्याचे कमलेश निकम यांनी सांगत आरोप फेटाळून लावले आहेत .

संबंधित पोस्ट