उल्हासनगरात पोलिसानी केले लाखो रुपयाचे मोबाईल हस्तगत दोन आरोपी अटक

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात मोबाईल चोरांचा सुळसुळात झाला असुन या चोरांवर पोलिस देखिल अंकुश लावन्यात यशस्वी होत आहेत . काल मध्यवर्ती पोलिसानी दोन अट्टल मोबाईल चोराना पकडुन त्यांच्या कडुन एक लाख २५ हजार रुपयाचे मोबाईल हस्तगत केले आहेत तर दोन्ही सराईत चोराना अटक करन्यात आली आहे . 

उल्हासनगर कॅंप ३ येथिल मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरांवर पोलिसानी आपली दक्ष नजर ठेवली आहे .उल्हासनगर   कॅंप ३ येथे राहणारे संजय हुलवान हे रस्त्याने जात असताना त्याना दोन जणानी पकडुन त्यांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम ४ हजार ५०० रुपये जबरदस्तीने  काढुन घेतले . तेव्हा त्यांच्या तक्रारीवरुन पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते . सहायक पोलिस आयुक्त डी डी टेळे व मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश राळेभात डी बी पथकातील पो . ह . बेंद्रे  पो ना . ठाकुर , चव्हाण,पाटील ,पवार यानी  तपास सुरु केला असता त्यानी कैलास उर्फ कांद्या प्रकाश गायकवाड (१८) व शंकर अशोक साळुंखे (१८) याना अटक केली . त्यांच्या कडुन सॅमंसंग,विवो,ड्युज या विविध कंपन्यांचे एक लाख २५ हजार रुपये किमंतीचे  मोबाईल हस्तगत केले. तर त्या दोन सराईत गुन्हेगाराना अटक केली असुन न्यायालयाने त्याना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .

संबंधित पोस्ट