न्यायालयाच्या आवारात गदारोळ,राकेश पाटील यांच्या आरोपींना न्यायालयात आणतांना घडला प्रकार .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : अंबरनाथ मनसे उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या  हत्येतील अटक असलेल्या आरोपींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी  उल्हासनगर न्यायालयाच्या आवारात करण्यात आली.यावेळी जमलेल्या महिलांनी शिवीगाळ करून न्यायालयाच्या आवारात मोठा गदारोळ केला. यामुळे काही काळ वातावरण तंग होते. 

अंबरनाथ मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची गेल्या महिन्यात पालेगांव भागात तीक्ष्ण हत्याराने ७ ते ८ जणांच्या टोळीने हत्या केली होती.हत्येतील आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने काल  शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले,व न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर आरोपींना पुन्हा पोलीस ठाण्यात घेऊन जात असतांना पाटील यांचे कुटूंबीय आणि नातेवाईकांनी आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत गोंधळ घातला ,मात्र पोलिसांनी या आरोपींना आधीच गाडीत बसवल्याने गडबड झाली नाही.या हत्ये प्रकरणी मुख्य आरोपी,डी.मोहन,भरत पाटील,रमेश डोबारी आणि इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येतील सूत्रधार अंबरनाथ शहरातील एका मोठा बांधकाम व्यावसायिक असल्याचा आरोप पाटील कुटूंब करीत असून त्याला देखील आरोपी करून अटक करण्याची मागणी कुटूंबियांनी केली आहे.

संबंधित पोस्ट