उल्हासनगरात मोबाईल चोरणाऱ्या तीन तरुणी अटक.

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल नेहरु चौकात गर्दीचा फायदा घेवुन खोपोली येथे राहणाऱ्या तीन तरुणीनी बाजारात येणाऱ्या काही  महिलेच्या पर्स मधुन मोबाईल चोरल्याच्या संशया वरुन त्याना पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर त्यांची अंग झडती घेतली असता तीन मोबाईल व काही रोख रक्कम असा २४ हजार ५९० रुपये किमंतीचा ऐवज मिळुन आला म्हणुन त्या तीन तरुणीवर  उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन त्याना अटक करन्यात आली आहे . 

उल्हासनगर कॅंप २ नेहरु चौकात गजानन मार्केट असुन या मार्केट मध्ये सध्या दिवाळी निमित्त खरेदी करन्या करिता महिला पुरुष मोठ्या प्रमाणात येतात . दरम्यान काल अंबरनाथ पुर्व येथे राहणाऱ्या गृहणी माधुरी मारुती डगळे (३२)  ह्या काही खरेदी निमित्त गजानन मार्केट मध्ये आल्या होत्या . तर त्या एका दुकानात काही तरी खरेदी करत असताना तीन तरुणी त्या दुकानात शिरल्या व त्यानी गर्दीचा फायदा घेत एका तरुणीने माधुरी डगळे यांच्या बॅग मधुन मोबाईल काढला . दरम्यान बॅग हलकी वाटत असल्याने त्यानी बॅग चेक केली असता  मोबाईल नसल्याचे दिसले . तर त्यांची नजर त्या संशयीत तीन तरुणीवर गेली त्यानी एकी ला पकडुन तिची अंग झडती घेतली असता तिच्या कडे मोबाईल मिळुन आला . तेव्हा त्या माधुरी डगळे यानी त्या तीन ही तरुणीना दुकानदाराच्या मदतीने उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात  दिले . तर पोलिसानी ही त्या तीन  तरुणींची अंग झडती घेतली असता तिघी कडे ही मोबाईल पर्स व काही रोख रक्कम असा २४ हजार ५९० रुपयाचा ऐवज मिळुन आला . उल्हासनगर पोलिसानी सोनी राहुल काळे (२१) सपना विशाल पवार (२०) व मनिषा दिपक काळे (२१) ह्या  . खोपोली बस स्टॅंड जवळील झोपडपट्टीत राहणाऱ्या आहेत   . यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला असुन तिघीना ही अटक केली आहे त्यानी या पुर्वी ही किती मोबाईल चोरलेत याचा तपास पोलिस करणार आहेत .  तर या गुंह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक वाय पी माळी हे करत आहेत .

संबंधित पोस्ट