
आदिवासी परिवाराना पोलिस सरंक्षण द्या,समाजसेवक रामजी महेश्वरी यांची मागणी .
- by Rameshwar Gawai
- Nov 08, 2020
- 1616 views
उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर शहराजवळ असलेल्या कांबा शेजारच्या वाघेर पाड्यातील आदिवासी परिवाराच्या जिवीतेला प्रकाश बुधरानी,गिरीश बुधरानी व विशाल बुधरानी या भुमाफिया कडुन धोका असल्याने या परिवाराना पोलिस सरंक्षण देण्यात यावे अशी मागणी समाजसेवक रामजी महेश्वरी यानी तहसिलदार याना केली आहे .
उल्हासनगर लगत असलेल्या कांबा गांवच्या शेजारी असलेल्या वाघेर पाडा येथे राहणारे सावळाराम पुजारी सुरेश हिंडोळे . व काठोड पुजारी यांची (१९५४ पासुन ) सर्व्हे न . ४७/१ मधिल २० गुंठे जमीन पुर्वजा पासुन ताब्यात कब्जात व कुळवहिवाटीत आहे.यानी आपल्या शेतात लावणी होती पीक उभारणीत आल्यावर यांच्या शेतातील उल्हासनगरचे भुमाफिया प्रकाश बुधरानी गिरीश बुधरानी व विशाल बुधरानी यानी आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने रात्रीच्या वेळी उभे पीकच जेसीबी लावुन नष्ट केले आहे . तर यांचे शेतात असलेले घर तोडुन टाका व या शेतावरील कब्जा सोडुन देण्यात यावे अन्यथा याचे वेगळे परिणाम होतील अशी धमकी या भुमाफियानी या आदिवासी परिवाराला दिली आहे.त्यामुळे या आदिवासी परिवाराना पोलिस सरंक्षण देन्यात यावे अशी मागणी समाजसेवक रामजी महेश्वरी यानी कल्याण तहसिलदार यांच्या कडे केली आहे. दरम्यान या आदिवासीच्या जमीनी चे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालय.मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. तसेच अनुसुचित जाती जमाती आयोगा पुढे प्रलंबित आहे.तर या भुमाफियांवर एक्ट्रोसिटी सह गुन्हे देखिल दाखल आहेत.तरी पण या भुमाफियाना कायद्याचा जराही धाक नाही . त्यामुळे या भुमाफियांवर आदिवासीच्या जमिनीतील पीक नष्ट केल्याच्या आरोपा खाली गुन्हे दाखल करुन कारवाई करन्याची मागणी सह या अदिवासी परिवाराना पोलिस सरंक्षण देण्यात यावे अशी मागणी समाजसेवक रामजी महेश्वरी यानी कल्याण तहसिलदार यांच्या कडे केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम