कोविड टेस्टींग लँबवर कोणाची परवानगी न घेता लाखो रुपयाची उधळपट्टी - मनसेचा आरोप .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेने शहरातील नागरिकांच्या कोविड  चाचण्या करण्यासाठी उल्हासनगर १ मधिल कोणार्क  रेसिडेंसीच्या  बाजूला कोविड  चाचणी सेंटर  सुरू करण्यासाठी एका ठेकेदाराला ई-निविदेद्वारे  सहा लाख रुपयाचा ठेका दिला होता. सदर ठेकेदार निविदेतील अटीशर्ती पुर्ण करु शकत नसतांना सुध्दा हे काम निविदेतील अटी शर्तीनां केराची टोपली दाखवून या लॅब च्या कामावर कोणाची ही परवानगी न घेता लाखो रुपयाची उधळपट्टी करन्यात आली असुन या कामात  काही अधिकाऱ्यांचे  हित संबंध जपले  आहेत म्हणुनच  हे काम सदर ठेकेदाराला देण्यात आले आहे . त्यामुळे या लॅब च्या कामाची  चौकशी करन्याची  मागणी मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी आयुक्त डॉ . राजा  दयानिधी यांच्या कडे केली आहे.

कोविड टेस्टिंग लॅब च्या कामा  करिता   ६ लाख ६ हजार ९७१ रुपये खर्च करुन  ठेकेदाराने ते काम वेळेत पुर्ण केलेले नसतांना सुध्दा सदर ठेकेदाराने आपल्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन या कामाचा खर्च जवळपास ५५ ते ६० लाख रुपयां पर्यंत नेऊन ठेवला आहे. ते ही कोणताही नविन प्रस्ताव तयार न करता किंवा मा.आयुक्त, स्थायी समिती किंवा महासभा या पैकी कोणाचीही मान्यता न घेता हे काम सदर ठेकेदाराला देण्यात आले आहे.ही बाब सुध्दा  अत्यंत  गंभीर आहे.जर या कामाला ५५ ते ६० लाख रुपये खर्च होता तर मग सहा लाख रुपये  चुकीचा प्रस्ताव का तयार करण्यात आला.शासन निर्णय क्रमांक मातंस/ नस्ती २०१२ /प्र.क्र.२७३ /३९  दिनांक २६  नोव्हेबर  २०१४  नुसार जर ३ लाख रुपयापेक्षा जास्तीच्या रकमेचे  काम असेल तर अगोदर ई-निविदा काढण्यात यावी व नंतरच ते काम करण्यात यावे म्हणजेच  जेणे करुन शासकीय कामात पारदर्शकता  येईल . परंतु महापालिकेचे  अधिकारी या  शासन निर्णयाला  जुमानत नाहीत.  त्यामुळे या सर्व कामा मागच नेमक गौडबंगाल काय असा आरोप करुन  या  कामाची चौकशी होणे आवश्यक आहे असेही बंडू देशमुख व संजय घुगे यांनी सांगितले.

शासन नियमा प्रमाणे एखाद्या मजूर सोसायटीला प्रयोग शाळा उभारण्याचे  काम देता येत नाही. कारण मजूर सोसायटी कडे कुठल्याही कामाचा अनुभव नसतो आणि या  ठेकेदारा कडे या आधी अशी कुठलीही प्रयोग शाळा उभारल्याचा किंवा आरोग्य विभागात काम केल्याचा कोणताही अनुभव नसतो असे आसतांना ही  या  कामा मागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत याचीही चौकशी करन्याची मागणी बंडु देखमुख यानी आयुक्ता कडे केली आहे .

दरम्यान या  संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन यामध्ये जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर  कडक कारवाई करण्यात यावी अशी   मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.  यावेळी उपजिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख ,शहर संघटक मैनुऊद्दीन शेख, अनिल गोधडे, तन्मेश देशमुख, सुहास बनसोडे, यश पाटिल उपस्थित होते

संबंधित पोस्ट