उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्याना साडे बारा हजार रुपये दिवाळी बोनस .
- by Rameshwar Gawai
- Nov 06, 2020
- 1524 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्याना दिवाळी निमित्त साडे बारा हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सत्ताधारी व युनियन नेत्यांच्या झालेल्या मॅरेथान बैठकीत घेण्यात आला आहे . तर दिव्यांगाना सुध्दा अनुदान देन्याचे निश्चित करन्यात आले असुन गेल्या वर्षी कर्मचाऱ्याना दिवाळी बोनस हे १५ हजार रुपये देन्यात आला
उल्हासनगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगली व्हावी म्हणुन बोनस देन्यात येते . या वर्षीच्या दिवाळी बोनस देन्यात बाबत काल एका बैठकीचे आयोजन करन्यात आले होते . या बैठकीत मोठ्या प्रमाणात वाद विवाद व युक्तीवाद होवुन अखेर चार तासानी दिवाळी बोनस हा साडे बारा हजार रुपये देन्याचा निर्णय घेन्यात आला आहे . यंदा कोविड च्या प्रादुर्भावाने महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत खराब झाली आहे . उत्पन्नात घट झाल्याने महापालिके कडे पैसा नाही . त्यामुळे यंदाची दिवाळी ही साडे बारा हजार रुपये बोनस घेवुन साजरी करायची आहे . महापालिका व शिक्षण मंडळ असे एकुण अडीच हजार कर्मचारी आहेत. तर दिव्यांगाना ही ८४ लाख रुपयाचे अनुदान वाटप करन्यात येणार आहे . त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ४ कोटी ८० लाख रुपयाचा भार पडणार आहे. या बैठकी मध्ये महापौर लिलाबाई आशान आयुक्त डॉ राजा दयानिधी,उपमहापौर भगवान भालेराव,स्थायी समिती सभापती विजु पाटील,सभागृह नेते भारत गंगोत्री विरोधी पक्ष नेते किशोर वनवार, अतिरिक्त आयुक्त सौ करुणा जुईकर,युनियन अध्यक्ष चरणसिंग टाक,दिलीप थोरात,राधाकृष्ण साठे,दिपक दाभणे,कैलास झाल्टे . हे उपस्थित होते.नगरसेवक राजेंद्र चौधरी यानी या साडेबारा हजार रुपये बोनस बाबत नाराजी व्यक्त केली आहे.महापालिकेतील कर्मचाऱ्यानी कोविड काळात जीवाचे रान करुन काम केले आहे.तर काहीचे जीव सुध्दा गेले आहेत . त्यामुळे या कर्मचाऱ्याना १५ हजार रुपये बोनस द्यायला पाहिजे होते .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम