महिलेची हरवलेली बॅग वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मदतीने परत .

उल्हासनगर(प्रतिनिधी)  : उल्हासनगर २  येथिल गोल मैदान परिसरात  सौ  वनिता जितू कार्य यांची  हँड बॅग हरवलेली होती .ती बॅग शेखर  सुरजपाल उज्जैनवाल (३६)  याना मिळाली असता त्यानी ती बॅग मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या कडे सुपूर्द केली . दरम्यान सुरडकर यानी त्या बॅगेत असलेल्या मोबाईल वरुन सौ वनिता जितु कार्य यांच्या शी संपर्क करुन तुमची हॅंड बॅग आमच्या कडे एका इसमाने आणुन दिली आहे . तेव्हा ती बॅग घेन्या करिता तुम्ही या असे सांगितले . दरम्यान ती महिला मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गेल्यावर तिला तिची बॅग परत करन्यात आली आहे.  त्या बॅगेत काही महत्वाची कागदपत्रे सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा मोबाईल व ड्राईव्हिंग लायसंस सह  रोख १७००० रुपये त्यात ५०० रुपयाची चिल्लर व काही घरगुती सामान असे त्या बॅगेत असलेले एकुण १८ हजार रुपयाच्या ऐवजा  सह ती बॅग त्या महिलेला परत करुन एक माणुसकी जपली आहे . तर कॅंप ३ येथिल फालवर लाईन येथे राहणारे शेखर सुरजपाल उज्जैनवाल याना मिळालेली  बॅग  पोलिस ठाण्यात  जमा केल्याने त्यांचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर व पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यानी फुल गुच्छ देवुन सत्कार केला आहे . एका गरीब इसमाने १८  हजार रुपये रोख सह मोबाईल व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग पोलिस ठाण्यात जमा करुन एक माणुसकी दाखवली आहे .

संबंधित पोस्ट