उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती ४ च्या सभापती सौ अंजलीताई साळवे यांनी केली डंपिंग ग्राऊंडची पाहणी .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिका  प्रभाग समिती ४ च्या सभापती पदाचा पदभार स्वीकारताच  काँग्रेसच्या  गटनेत्या सौ . अंजलीताई  साळवे यांनी त्यांच्या दालनात प्रभाग ४ चे  प्रभाग अधिकारी  तुषार सोनावणे,काँग्रेसचे  महासचिव रोहित साळवे यांच्या समक्ष सर्व प्रभाग ४ च्या अंतर्गत स्वच्छता निरीक्षकांची बैठक आयोजित केली होती.त्या नंतर त्यानी कॅंप ५ येथिल डंपिंग ग्राऊंड ची पाहणी करुन अधिकाऱ्याना काही महत्वाच्या सुचना करुन त्यानी  आपल्या कामकाजाला सुरवात केली आहे . 

त्यानी अधिकाऱ्यांची बैठक घेवुन नियमित  कुंडीत असलेला  कचरा  ठेकेदारा कडून उचलून घेणे व ठरलेल्या वेळेच्या आत कचरा न उचलल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करन्याचे आदेश त्यानी अधिकाऱ्याना दिले आहेत . 

तर प्रत्येक प्रभागात ओला कचरा व सुखा कचरा विलगीकरण करून किमान एक कंपोस्ट पिट उभारणी करण्याच्या सुचना देखिल त्यानी दिल्या  

असुन शहरात जागो जागी जमा  होत असलेला डेब्रिस नियमित पणे  उचलून घेणे व डेब्रिस सार्वजनिक ठिकाणी फेकणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करणे त्याच प्रमाणे महापालिकेच्या मालकीचे असलेले जिर्ण झालेले शौचालये ताब्यात घेण्याचे ही आदेश त्यानी  दिले आहेत . 

तर डंपिंग  ग्राउंडमुळे  येथील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नियमित पणे  दुर्गंधीनाशक  व किटकनाशक रसायनाची  फवारणी करुन   मेलेले जनावर त्या ठिकाणी टाकण्यास   प्रतिबंध करण्यात यावा या विषयावर चर्चा करुन सभापती यानी 

उल्हासनगर कॅंप  ५ येथील डंपिंग  ग्राऊंडची  अधिकाऱ्या  सोबत समक्ष पाहणी केली व तिथल्या समस्या जाणून घेवुन या सर्व विषयावर आयुक्ता सोबत चर्चा करुन पाठपुरावा करन्यात येइल असे आश्वासन सभापती सौ अंजलीताई साळवे यानी नागरिकाना दिले आहे .

संबंधित पोस्ट