उल्हासनगर महापालिका परिवहन समिती ठप्प,खर्च मात्र सुरू.

उल्हासनगर(प्रतिनिधी):   उल्हासनगर महानगर पालिकेच्या अखत्यारीतील परिवहन सेवा अनेक वर्षां पासून रस्त्यावर धावतच नसली

तरी समिती सभापती, सदस्य यांच्या कार्यालयांंचे मानधन व इतर भत्ते यांच्यावर वारेमाप खर्च करतांंना दिसत आहे. परिणामी एकिकडे महापालिका  तिजोरीवर खर्चाचा ताण वाढतोय तर दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत .  व पर्यायाने रहदारी खोळंब्याने नागरिक बेजार झाले आहेत . 

 ही सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेने अनेकदा निविदा निमंत्रित करूनही त्यास अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे  सध्या परिवहन सेवा ठप्प पडली असली तरी देखील परिवहन समिती सभापती व सदस्य यांचे मानधन ,कार्यालयीन व इतर भत्ते यावर महापालिका सातत्याने पैसे उधळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आमदार कुमार आयलानीं याना उशीरा सुचलेल शहाणपण.   

विद्यमान आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील ठप्प पडलेल्या परिवहन सेवेकरीता चिंता व्यक्त केली आहे. या करिता, अनेकदा  उल्हासनगर महापालिका प्रशासन यांना त्यांनी सेवा सुरू करण्यासाठी मागणी केली आहे. परंतु, सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात ही सेवा सुरू करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, स्वतःच्या आमदार निधी व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करुन ही सेवा त्यांनी कार्यान्वित करण्याची इच्छा त्यांनी दर्शविली आहे . 

 प्रतिक्रिया :राजेंद्र चौधरी, नगरसेवक 

विद्यमान आमदारांची कल्पना चांगली आहे मात्र त्यांची महानगरपालिकेत, राज्य व केंद्रात सत्ता असतांंना ते शहरातील परिवहन सेवा  सुरू करू शकले नाहीत. आता मात्र मुक्ताफळे उधळीत आहेत. याबाबत महापौर व आयुक्त यांच्या पुढाकाराने सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन नफा ना तोटा अथवा बीओटी तत्त्वावर ही परिवहन सेवा सुरू करण्यात यावी.

संबंधित पोस्ट