भात पिकाला एकरी २५ हजार नुकसान भरपाई देण्याची कुणबी सेनेची मागणी

शहापूर - महेश धानके:ठाणे जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत असून भतपिक उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुणबी सेनेने केली आहे.

   काल शहापूर तहसीलदार कार्यालयात कुणबी सेनेचे सेनापती विश्वनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणबी सेनेने वरील मागणीसह ८ प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांना देण्यात आले,यावेळी बोलताना विश्वनाथ पाटील म्हणाले की कोरोना आणि दुष्काळ यात शेतकरी भरडला गेला आहे,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी १० हजार रुपये मदत ही तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे,तरी शेतकऱ्यांचा अंत न पाहता सरसकट मदत करावी अशी मागणी करतानाच प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले, यावेळी कुणबी सेनेचे तालुका अध्यक्ष दिनेश निमसे,कृष्णा भेरे,साई जाधव,सुरेश घरत,योगेश निपुर्ते शिवाजी सपाट यांचेसह अनेक कुणबी सैनिक उपस्थित होते

संबंधित पोस्ट