उल्हासनगरातील वालधुनी नदी भूमाफियांंच्या विळख्यात .

उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगरातील बेकायदेशीर बांधकामं बेलगाम घोड्यासारखी चौफेर वाढत आहेत. विशेष म्हणजे या नैसर्गिक साधनसंपत्ती, जी शाश्वत विकासा साठी टिकवण्याची गरज आहे त्यावरही भुमाफियांनी अतिक्रमण केले आहे.  या नदीपात्रात डझनभर जुनी व पिंपळ वृक्ष कत्तली करून दिवसाढवळ्या व्यवसायिक दुकाने उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे दिसून येतंय.

कँप ३ मधील, नीलम हॉटेलच्या मागे, १७ सेक्शन येथे शहराच्या मध्यभागी असणाऱ्या वालधुनी नदीच्या पात्रात ही झाडे छाटणी

शहरातील राजाश्रय  लाभलेले राजकीय गुंड, भुमाफिया माफिया यांच्या संगनमताने सुरू असल्याचे दिसून येते.

नदीच्या सीमा रेषेपासून २०० मीटर वर कोणतेही बांधकाम होऊ नये हा नियम धुडकावून भूमाफियांनी प्रशासनाला आव्हान दिले आहे. वालधुनी नदी वाचवणे व प्रदूषण मुक्त करण्यासाठी शहरातील ' वालधुनी बिरादरी ' ही  संस्था गेली अनेक वर्षांपासून हरित लवादाशी व न्यायालयीन संघर्ष करीत आहे.  प्रशासन ही बांधकाम रोखण्यासाठी राजकीय दबावाखाली असून गंभीर नसल्याची खंत शशिकांत दायमा यांनी समाजमाध्यमाद्वारे व्यक्त केली आहे.  यानंतर तरी प्रशासन कठोर भूमिका घेईल का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

संबंधित पोस्ट