उल्हासनगर काँग्रेसचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे केले आहेत .  ते रद्द करण्यात यावेत या मागणी करिता  उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या च्या वतीने   सरदार वल्लभ भाई  पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृती दिना निमित्त शेतकरी अधिकार दिवस पाळत येथिल  प्रांताधिकारी कार्यालयावर  कॉंग्रेस चे  जिल्हा अध्यक्ष राधाचरन करोतीया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आंदोलन आले . 

या आंदोलनात माजी  महापौर मालती करोतीया जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार वजिउदीन  खान,ब्लाँक अध्यक्ष- किशोर धडके,सुनिल बहरानी , महासचिव तथा अनूसुचित जाती विभाग अध्यक्ष दिपक सोनोने,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रोहित आव्हाड,सेवादल अध्यक्ष शंकर आहुजा उपाध्यक्ष अनिल यादव, युथ अध्यक्ष फजल खान,  ओ बी सी अध्यक्ष सुरेश काजळे  भागवत तायडे ,राजेश मनोत्रा,संदिप बिरारे.  मोहम्मद शेख,रंजीत साळवे,दत्ता खंडाळे . नरेन करोतीया यांच्या सह शेकडो  पदाधिकारी शामिल झाले होते. तर आपल्या मांगण्याचे निवेदन प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे याना देण्यात आले .

संबंधित पोस्ट