उसाटणे गांवा जवळील ३० एकर जागेवर नाही बनणार डंपिंग ग्राऊंड,फक्त घनकचऱ्यावर होणार प्रक्रिया -आयुक्त

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर कॅंप ५ येथिल  अनधिकृत डंपिंग ग्राऊंड वरुन गेल्या चार वर्षा पासुन वाद सुरु आहे .  गेल्या ४ वर्षा पासुन त्या डंपिंग वर दररोज ३६० टन  विना प्रक्रिया कचरा टाकन्यात येतो त्यामुळे त्या डंपिंग वर मोठ मोठे ढिग साचले आहेत . परंतु हे डंपिंग हटविन्या साठी  शहरातील राजकिय लोकानी आंदोलन केले आणि त्याच आंदोलनाची यशस्वीता म्हणुन शासनाने ३० एकर जमीन उसाटणे गांवाजवळ देवु केली आहे . परंतु या जागेला त्या गांवातील नागरिकानी तीव्र विरोध केला आहे . 

दरम्यान उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ राजा दयानिधी यानी या डंपिंग बाबत सावध प्रतिक्रिया देत म्हटले  आहे की उसाटणे गांवा जवळील ३० एकर जागेवर डंपिंग ग्राऊंड बनणार नाही तर त्या जागेवर फक्त घन कचरा प्रकल्प बनणार आहे . त्या ठिकाणी मोठ्या मशिन लावुन सुख्या कचऱ्याला रिसायकलिंग करुन तो उपयोगात आणन्यात येणार आहे .ही माहीती आयुक्त यानी स्वता एन जी टी ला ( हरित लवाद ) दिली असुन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ जुईकर यानी मलंगगडा जवळ स्थानिक नागरिक आंदोलन करत असताना त्यानी सुध्दा त्या नागरिकाना येथे डंपिंग ग्राऊंड बनणार नसुन फक्त कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तयार करु अस आश्वासन त्या नागरिकाना दिल आहे . दरम्यान कॅंप  ५ येथिल डंपिंग ग्राऊंड ची क्षमता संपलेली आहे .त्या ठिकाणी असलेल्या ५ एकर जागेवर  २०१६ पासुन कचरा टाकन्यात येत आहे . तर दररोज ३६० टन कचरा त्या जागेवर टाकन्यात येतो . अजुन ही त्याच जागेवर कचरा टाकन्यात येत असुन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट २००० च्या कलम ३ नुसार त्या डंपिंग ग्राऊंडला ६० सेमी चिकन्या मातीचे कवर लावणे बंधनकारक आहे . आणि त्याच मातीवर १५ सेमी च्या ड्रेनेज करिता माती टाकावी लागणार आहे . वरुन ४५ सेमी अलग माती टाकन्याचे ही प्रावधान आहे . जेणे करुन त्या जागेवर गवत झाडे उगवली पाहिजेत .कधी काळी त्या जागेवर भूस्खलन होवु नये म्हणुन   वेळोवेळी त्या जागेची पाहणी करणे ही आवश्यक आहे 

जर त्या जागेवर भुस्खलन झाले तर त्यातुन मिथेन नावाचा विषारी वायु निघाला तर तो नागरिकांच्या आरोग्याला  धोकादायक आहे दरम्यान त्याच डंपिंग ग्राऊंड शेजारी शेकडो घरे असुन डंपिंग  जर खचले तर या नागरिकांच्या जिवावर बेतु शकते . मात्र उसाटणे गांवा जवळ मिळालेल्या ३० एकर जागेवर डंपिंग ग्राऊंड न बनता त्या जागेवर घनकचरा व्यवस्थापन तयार करुन त्या कचऱ्याच्या प्रक्रियेतुन गॅस . वीज.  इंधन  व पेव्हर ब्लॉक इत्यादी वस्तु बनवन्याचा प्रकल्प तयार करन्याचा मानस आयुक्त डॉ  राजा दयानिधी यानी व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्ट