उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत विजु पाटील यांचा विजय .

उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर महापालिकेच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती  पदाच्या निवडणुकीत भाजपाचेच असलेले पण शिवसेनेच्या मदतीने उभे राहिलेले विजु पाटील यानी भाजपाच्याच नगरसेविका जया प्रकाश माखिजा यांचा एक मतानी पराभव करुन विजय मिळवला आहे.  तर ही निवडणुक ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या देखरेखित पार पडली आहे . दरम्यान या पुढे मी भाजपाचा सभापती म्हणुन राहणार असल्याची प्रतिक्रिया स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती विजु पाटील यानी दिली आहे .

उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची  निवडणुक पार पडन्या पुर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या असुन याच घडामोडीचे परिणाम निवडणुकीवर झाले आहेत . भाजपाच्या जया माखिजा व राजु जग्यासी यानी सभापती पदा करिता उमेदवारी अर्ज दाखल केला होता . तर शिवसेनेच्या मदतीने आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वादाने भाजपाचे नगरसेवक विजु पाटील यानी स्थायी समिती सभापती पदा साठी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा पासुनच  इतर घडामोडीना सुरवात झाली होती . दरम्यान भाजपा कडे सदस्य संख्या ९ होती तर शिवसेना व मित्र पक्षा कडे सदस्य संख्या ७ होती . तर विजु पाटील यानी अर्ज दाखल केल्याने सदस्य संख्या समसमान झाली होती . त्यातच भाजपाचे एक ज्येष्ट नगरसेवक डॉ . प्रकाश नाथानी यानी सदस्यत्वाचा दिलेला राजिनामा हा देखिल विजु पाटील यांच्या पथ्यावर पडला आहे . दरम्यान नाथानी यानी दिलेल्या  राजिनाम्यामुळे भाजपाची सदस्य संख्या ७ वर गेली . आज सकाळी भाजपाचे राजु जग्यासी यानी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला तर जया माखिजा व विजु पाटील हे दोघे ही भाजपाचे असताना यांच्यात निवडणुक झाली आणि विजु पाटील याना ८ मते पडली तर जया माखिजा याना ७ मते पडली दरम्यान एका मतानी भाजपाचे पाटील यानी भाजपाच्याच  जया माखिजा यांचा पराभव केला आहे . दरम्यान ही निवडणुक जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या देखरेखित पार पडली आहे . या निवडणुकीत कोणता ही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पोलिस बंदोबस्त सुध्दा चांगला ठेवन्यात आला होता

संबंधित पोस्ट