भाजपाच्या एका नगरसेवकाचा स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा .विजु पाटील यांचा विजयाचा मार्ग मोकळा .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावरुन भाजपात मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळुन आली असुन काल भाजपाचे  नगरसेवक डॉ . प्रकाश नाथानी यानी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने आता विजु  पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे . तर माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच उल्हासनगर मधिल वर्चस्व संपत चालले असे चित्र दिसु लागले आहे . 

उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणुक २९ ऑक्टोंबर रोजी होत आहे . तेव्हा या पदा करिता भाजपा कडुन जया प्रकाश माखिजा . राजु जग्यासी यानी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर  भाजपाचेच असलेले नगरसेवक विजु  पाटील यानी शिवसेनेच्या मदतीने  स्थायी समिती पदा करिता उमेदवारी अर्ज भरला आहे . त्यामुळे भाजपातील बंडाळी दिसुन आली आहे . दरम्यान भाजपाचे सदस्य ९ व शिवसेना मित्र पक्षांचे सदस्य ७ असे संख्या बळ होते . परंतु विजु पाटील यानी शिवसेने च्या मदतीने उमेदवारी अर्ज भरल्याने दोन्ही कडील सदस्य संख्या समसमान झाली आहे . त्यात  भाजपाचे नगरसेवक डॉ . प्रकाश नाथानी यांच्यावर वेळो वेळी भाजपा कडुन अन्याय झाला आहे म्हणुन त्यानी काल स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देवुन भाजपाला पुन्हा झटका दिला आहे . दरम्यान आता भाजपाचे स्थायी समिती मधिल संख्याबळ आता ७ वर आल्याने भाजपाचा स्थायी समिती मध्ये पराभव नक्की होणार असुन भाजपाचेच असलेले पण शिवसेनेच्या पांठिब्यावर उभे असलेले विजु पाटील यांचा आता स्थायी समिती सभापती पदावर विराजमान होन्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर  भाजपाचे माजी मंत्री व आमदार रविंद्र चव्हाण यांचा  उल्हासनगर च्या राजकारणात नेहमीच हस्तक्षेप राहिला आहे . मात्र आता त्यांचे वर्चस्व कमी होत चालले आहे हे  या भाजपाच्या बंडाळीवरुन दिसत आहे .

संबंधित पोस्ट