
उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपा मध्ये होणार बंडाळी .
- by Rameshwar Gawai
- Oct 27, 2020
- 1285 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : राजकारणात बहुमताचे गणित कधी व कसे बिघडेल याचा नेम नसतो. क्रिकेट प्रमाणेच राजकारण हे कमालीचे अनिश्चित असते.याचा प्रत्यय वारंवार येतो.
उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समितीत कागदोपत्री भारतीय जनता पक्षाला बहुमत आहे.भाजपाचे नऊ सदस्य तर शिवसेना मित्र पक्षाचे सात सदस्य आहेत.या आकडेवारी वरून शिवसेना मित्र पक्षाला सभापती पद मिळू शकत नाही, असाच अंदाज असुन या निवडणुकीत भाजपात बंडाळी होन्याची शक्यता नाकारता येत नाही .
काल स्थायी समिती सभापती पदाचे नामनिर्देशन अर्ज भरन्यात आले असुन भाजपात उभी आडवी फूट पडणार असल्याचे चित्र दिसुन आले आहे. भाजपाचे म्हणवणारे व पुर्वाश्रमीचे शिवसैनिक विजय पाटील यानी नामनिर्देशन अर्ज सादर केला असुन त्याना सुचक व अनुमोदक हे शिवसेनेचे नगरसेवक झाले आहेत. भाजपाची संख्या ९ वरून ८ वर तर शिवसेना मित्र पक्ष देखील सातवरून आठ वर आली आहे. म्हणजे समसमान संख्या बळ झाल्याने ही निवडणुक चिठ्ठी च्या भरवश्यावर सुध्दा होवु शकते .
भाजपाचे किमान दोन स्थायी समिती सदस्य आहेत,जे उघड उघड नाराज असून त्यांची मतं वा अनुपस्थिती यावर भाजपा उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे
विजय पाटील यांना किमान नऊ मतं मिळतील तर भाजपाला सहा मतं मिळतील त्यात एक सदस्य अनुपस्थित राहू शकतो असा अंदाज ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर यानी व्यक्त केला आहे .दरम्यान मालवणकर यांच्या अंदाजा प्रमाणे झाले तर
भाजपाला पाच तर शिवसेना मित्र पक्षांचे समर्थन लाभलेले विजय पाटील हे तीन मताधिक्याने विजयी होवु शकतात .
भारतीय जनता पार्टीला स्थायी समिती च्या सभापती निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागेल, ओमी कलानीला स्वतः कडे वळवून भाजपाची अवस्था तेल गेले,तुपही गेले हाती धोपाटणे आले ,अशी होईल.
मागील महापौर निवडणूकीत बंडखोरी करणा-या कलानी समर्थक नगरसेवकांवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचे फलित म्हणून हा पराभव भाजपाला पचवावा लागेल.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम