उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती २ व ४ च्या सभापती पदाच्या निवडणूका बिनविरोध .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असून , त्याचीच पुनरावृत्ती उल्हासनगर महानगरपालिकेत झाली आहे .  प्रभाग समिती २ च्या सभापती पदावर टि ओ के च्या सौ शुभांगीनी निकम तर प्रभाग समिती  ४ च्या सभापती पदावर कॉंग्रेस च्या सौ अंजलीताई साळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे . त्यांच्या विरुध्द कोणीच नामनिर्देशन अर्ज  भरले नसल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली आहे . आता प्रभाग समिती १ व ३ ची निवडणुक होणार आहे . उल्हासनगर महापालिकेच्या चार ही प्रभाग समितीच्या सभापती पदा करिता काल नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.  त्यात  महाविकास  आघाडी तर्फे काँग्रेसच्या गटनेता , नगरसेविका सौ अंजलीताई  साळवे यांनी शिवसेना शहर अध्यक्ष व नगरसेवक  राजेंद्र चौधरी , ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे , नगरसेविका ज्योती माने , व शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व पी.आर.पी पक्षाच्या सहमतीने उमेदवारी  अर्ज महापालिकेच्या  सचिव सौ.  प्राजक्ता कुलकर्णी  यांच्या कडे सादर  केला. 

मागील महापौर निवडणुकीत महापौर पदासाठी काँग्रेस पक्षाने दिलेले समर्थन तसेच राज्यात निर्माण झालेल्या   महाविकास आघाडीच्या अनुषंगाने ठाण्याचे पालकमंत्री व नगरविकासमंत्री मा.  ना.  एकनाथजी शिंदे  , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे  अध्यक्ष महसूलमंत्री मा.  ना.  बाळासाहेब थोरात , मा.  खा.  डॉ.  श्रीकांत शिंदे  व कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गोपालजी लांडगे  यांच्या आदेशाने व आशीर्वादाने ही  संधी अंजलीताई  साळवे यांनी देण्यात आली आहे.

भाजपा व इतर कोणत्याच पक्षातर्फे सदर पदासाठी उमेदवारी  अर्ज दाखल नसल्याने सौ अंजलीताई  चंद्रकांत साळवे हे प्रभाग समिती ४ च्या सभापती पदावर बिनविरोध निवडुन आल्या आहेत .

संबंधित पोस्ट