नरेश मोरे आत्महत्या प्रकरणी संबंधित कामगार व आधिकारी यांचेवर कार्यवाही करा.
- by Reporter
- Oct 27, 2020
- 896 views
कोल्हापूर (भारत कवितके) कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरूध्द आवाज उठविणारे सामाजिक कार्यकर्ते नरेश मोरे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या कामगारावर व संबंधित आधिकारी वर्गावर कडक कार्यवाही व्हायलाच हवी.
सामाजिक कार्यकर्ते नरेश मोरे यांनी विभागात मेलेले डुकर नगरपालिकेच्या कचरा गाडीत टाकून घेऊन जा.असे सांगितले असता कचरा गाडी वरील कामगारानी नरेश मोरेनीशी वाद घालून मेलेले डुकर ओढत नेले.या प्रकरणाची तक्रार नरेश मोरेनी संबंधित इचलकरंजी नगरपालिकेच्या विविध ठिकाणच्या आधिकारी वर्गाकडे केली,पण तक्रारीची दखल न घेता नरेश मोरेना अपमानित वागणूक देऊन परत जायला सांगितले.यामुळे निराश झालेल्या नरेश मोरेनी इचलकरंजी नगरपालिकेच्या आवारातच स्वत:ला पेटवून घेतले,जळालेल्या अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले पण ते मरण पावले.नरेश मोरेच्या तक्रारीची दखल घ्यायला हवी होती.आणि सामाजिक कार्यकर्ते नरेश मोरेनी असे आपले जीवन संपवायला नको होते.नरेश मोरे आत्महत्या प्रकरणी संबंधित कामगारावर व आधिकारी वर्गावर कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी महाराष्ट्राच्या विविध स्तरातून होते आहे.
रिपोर्टर