किन्नर समाजा तर्फे नवरात्री उत्सव जोरात साजरा .
- by Rameshwar Gawai
- Oct 25, 2020
- 782 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : नवरात्री उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केल्यावर त्या उत्सवाची सांगता करताना उल्हासनगर येथिल किन्नर समाजाच्या वतीने अष्टमी नवमी एक सोबत साजरी केली. तेव्हा कन्या पूजन, दुर्गा पूजन व महा भंडारा याचे देखिल आयोजन करन्यात आले होते .
लॉकडाउनच्या काळापासुन सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे बंद करन्यात आली आहेत . तर आपली धार्मिक परंपरा कायम राखत उल्हासनगर येथिल किन्नर समाजाच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२० रोजी उल्हासनगर कॅंप ४ येथे नवरात्री उत्सव साजरा करत घटस्थापना करुन दुर्गा पुजन केले .
या वर्षी कोरोना च्या प्रादुर्भावा मुळे लॉकडाउन झाल्या मुळे काही किन्नर मित्रानी एकत्र येउन मा .दुर्गा आणि घटस्थापना करत भजन कीर्तन यांच्या सोबतच पुजा करुन नवरात्री उत्सव साजरा केला .
किन्नर समाजाची गुरु.मा कमलाबाई यांच्या उपस्थिती मध्ये महक वाघ, शमा खान, रेणुका, फराह, सोनाली, सोनाक्षी, शिवानी, वंशिका आणि मोनिका यांच्या सह अन्य किन्नर समाजाचे भाऊ बहीण व स्थानिक नागरिकानी भाग घेतला .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम