उल्हासनगरातील मटका किंग संदीप गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन जणाना अटक .
- by Rameshwar Gawai
- Oct 23, 2020
- 1008 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल समाजसेवक आणि विविध पक्षात काम करुन अखेर मटक्याचा व्यवसाय करणारे मटकाकिंग संदीप गायकवाड यांच्यावर परवा रात्री अकरा वाजता कॅंप ४ येथिल श्रीराम चौकात एका अनोळखी इसमानी जवळील रिव्हाल्वर मधुन तीन राऊंड गोळ्या झाडल्या असुन त्यातील एक गोळी गायकवाड याना लागली असुन दुसऱ्या हल्लेखोरानी लोखंडी रॉडने गायकवाड यांच्या डोक्यावर जबर प्रहार करुन गंभीररित्या जखमी करुन पळुन गेले होते परंतु ठाणे येथिल खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यानी आपल्या पथकासह नाशिक येथे जाऊन त्या दोन्ही ही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळुन विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे . तर हा हल्ला पुर्व वैमनस्यातुन केल्याची कबुली या हल्लेखोरानी दिली आहे .
या बाबत माहीती देताना पोलिसानी सांगितले की परवा रात्री ११ वाजता संदीप गायकवाड हे आपले मित्र जहांगीर मोरे यांच्या सोबत कॅंप ३ कडे चालत येत असताना पाठीमागुन एम एस ०२ सी डब्ल्यु . ७३०० या हुंदाई वेरणा कार मधुन दोन अनोळखी इसम उतरले व त्यातील एकाने संदीप गायकवाड यांच्या दिशेने आपल्या रिव्हाल्वर मधुन तीन राऊन गोळ्या झाडल्या असुन यातील एक गोळी गायकवाड यांच्या पोटरीवर लागल्याने गायकवाड जखमी झाले . तर दुसऱ्या इसमाने हातातील लोखंडी रॉड ने डोक्यावर जबर प्रहार केला . त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत गायकवाड यानी पळन्यास सुरवात केली असता समोरुन पेट्रोलिंग करणारी पोलिसांची व्हॅन आली . लगेच गायकवाड हे त्या व्हॅन मध्ये बसले . दरम्यान पोलिस आल्याचे पाहुन ते दोन्ही अनोळखी आरोपी पळुन गेले असता पोलिसानी त्या आरोपीच्या गाडीचा पाठलाग केला . परंतु ते आरोपी गाडी सोडुन कल्याण च्या दिशेने पळुन गेलेत.दरम्यान संदीप गायकवाड याना उपचारा खाजगी रुग्णालयात हलविन्यात आले.तर या आरोपीना शोधन्या करिता पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यानी आदेश दिल्यावर ठाणे खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यानी हे आरोपी नाशिक येथे असल्याची माहीती मिळाली तेव्हा ते आपल्या पथकासह नाशिक येथे जावुन त्या दोन्ही आरोपीच्या मुसक्या आवळुन त्याना विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे . हितेश गुलबिर ठाकुर (२३) रा . शहाड फाटक उल्हासनगर ३ . सागर किरण शिंदे (२३) चोपडा कोर्ट उल्हासनगर ३ ही आरोपींची नावे असुन फिर्यादी संदीप गायकवाड यानी हितेश ठाकुर यांची हत्या करन्याची सुपारी कोणाला तरी दिली असल्याच्या संशयावरुन हल्ला केल्याची कबुली या दोन्ही आरोपी नी दिली आहे . तर आरोपी विरुध्द विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात ३०७,३४ सह शस्त्र अधिनियम कलम ३,२५ महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे . ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे,सहायक पोलिस निरीक्षक विकास घोडके, पोलिस उपनिरीक्षक जे डी मुलगिर, पोलिस उपनिरीक्षक एम टी कळमकर,रुपाली कदम अंकुश भोसले ,प्रकाश भुर्के, संदीप भांगरे . महेश सावळे ,चंद्रकांत ठाकरे, हेमंत महाले बाबु मुकणे,मोहन चौधरी यानी पार पाडली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम