महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते उल्हासनगरातील तीन कोरोना योध्दा सन्मानित .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर कॅंप  ४ येथिल  शासकिय  प्रसूतिगृहाला महापालिकेने कोविड रुग्णालय बनवले असुन या रुग्णालयाच्या  अधिक्षक डॉ भावना तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड रुग्णालय चांगली सेवा देत आहे . या रुग्णालयात एकुण ७० कर्मचारी असुन यात डॉक्टर,नर्सेस,वार्डबॉय,सफाई कर्मचारी,लॅब विभागातील कर्मचारी यांचा सामावेश आहे . हे सर्व स्टाफ कोरोना च्या संसर्गाने ग्रस्त झालेल्या रुग्णांवर अविरहत पणे उपचार करत आहेत . त्यामुळे कोकण विभाग स्तरावर या रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांचा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना योध्दा म्हणुन सन्मान करन्यात आला असुन त्या तीन कर्मचाऱ्याना प्रमाणपत्र देवु गौरविन्यात आले  आहे .  

उल्हासनगर कॅंप ४ येथिल शासकिय  प्रसूतिगृहाला महापालिकेने कोविड १९ रुग्णालय बनविले आहे . या रुग्णालयात ऑक्सिजन पासुन ते व्हेंटिलेटर सह इतर सुविधा उपलब्ध केल्या आहेत .हे रुग्णालय अधिक्षक डॉ . भावना तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे . तर कोरोना संसर्गाने ग्रस्त झालेल्या रुग्णांवर येथे चांगले उपचार होत आहेत . तेव्हा या रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ भावना तेलंग यानी  रुग्णालयातील लॅब टेक्निशीयन  सदानंद कांबळे , सिस्टर अलकनंदा भुरे व सफाई कर्मचारी पुनम कुडीया या तीन कर्मचाऱ्यांनी कोविड काळात अखंड सेवा दिल्या बाबत त्यांचे कौतुक करुन त्याना शासनाने कोरोना योध्दा म्हणुन सन्मान द्यावा अशी शिफारस केली . तेव्हा  उल्हासनगरच्या या तीन कर्मचाऱ्यांचा  महाराष्ट्र राज्याचे  राज्यपाल मा. श्री भगतसिंग कोश्यारी यानी कोरोना योध्दा हा सन्मान देवुन त्याना प्रमाणपत्र देवुन गौरविन्यात आले आहे . 

विशेष म्हणजे ही बाब उल्हासनगर करिता गौरवशाली आहे . राज्यपालांच्या हस्ते कोरोना योध्दा प्रमाणपत्र मिळवणारे उल्हासनगर हे एकमेव शहर आहे .

संबंधित पोस्ट