उल्हासनगर येथिल नागरिकांसाठी मैदाने व उद्याने दुरुस्ती करून खुले करा - कॉंग्रेसची मागणी

उल्हासनगर(प्रतिनिधी) :  कोविड १९ च्या  संक्रमणामध्ये अनलॉक ५ च्या  पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख खेळांची  मैदाने व उद्याने यांची  देखभाल दुरुस्ती करून नागरिकांसाठी खुली करण्याची  मागणी कॉंग्रेस च्या गटनेत्या सौ अंजलीताई साळवे यानी महापौर याना दिलेल्या निवेदनात केली आहे .  

उल्हासनगर काँग्रेस महासचिव रोहित साळवे व  गटनेता नगरसेविका सौ.अंजलीताई  साळवे यानी  महापौर लीलाबाई आशान  व नगरसेवक अरुण आशान   यांच्या  सोबत शहरातील प्रमुख मैदाने व उद्याने यांची दुरुस्ती करुन ते नागरिकांसाठी खुले करन्या बाबत सविस्तर चर्चा केली . आणि त्याना सदर मागण्याचे निवेदन दिले आहे . त्यानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत शहरातील अनलॉक ५  अंतर्गत दुकाने,हॉटेल,रेस्टॉरंट,काही अटी शर्तीच्या  आधीन राहून खुली करण्या करिता  परवानगी दिली आहे. परंतु लॉकडाऊनच्या   काळामध्ये मैदाने व उद्याने आता  पर्यंत नागरिकांसाठी प्रतिबंधीत  ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे   मैदाने व उद्याने यांची देखभाल व दुरुस्ती न केल्या ने  मैदाने व उद्याने यांची  अवस्था अत्यंत  बिकट बनली आहे. तसेच सदरची मैदाने व उद्याने नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नागरिकांना उद्याने व मैदाने खुली करणे आवश्यक आहे.

तरी  अनलॉक-५ च्या  सर्व अटी व शर्ती च्या  आधीन राहून  सर्व मैदाने व उद्यानाची   दुरुस्ती करून ते नागरिकांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी उल्हासनगर कॉंग्रेस चे महासचिव रोहित साळवे आणि कॉंग्रेस च्या गटनेत्या सौ अंजलीताई साळवे यानी महापौर लिलाबाई आशान याना दिलेल्या निवेदनात केली आहे .

संबंधित पोस्ट