
आदिवासी पाड्यांमध्ये प्रथम महिलांची शाळा.आणि ती सुद्धा ताडपत्रीने बनलेल्या तंबू मध्ये.
- by Rameshwar Gawai
- Oct 20, 2020
- 1325 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : युथ ऑफ टुडे वेलफेअर फाऊंडेशन आणि अम्मूकेअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ येथील मोहनजीचे आंगण या उपक्रमांतर्गत प्रकाशनगर शिवमंदिर अंबरनाथ (पूर्व) इथे बसलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये प्रथमच महिलांची शाळा राबवण्यात येत आहे, आणि त्यांच्या सर्वांगिक विकासासाठी देखील विविध उपक्रम राबवण्यात येत असुन या आदिवासी पाड्या मध्ये प्रथमच महिलांची शाळा भरविन्यात आल्याने येथिल महिलाना आता शिक्षणाचे चांगले धडे मिळणार आहेत
एवढेच नव्हे तर संपुर्ण आदिवासींचे परिवार स्वस्थ राहावे म्हणुन गेली ७ महीने कोरोना काळात पौष्टिक भोजन,व आरोग्य शिबीरे भरवुन त्याना औषधाचा वाटप केला आहे . या फाऊंडेशन च्या वतीने आता पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यामध्ये पशु पक्षी सेवा ,उल्हास वालधुनी नदी स्वच्छता अभियान , कोरोना काळा मध्ये अन्न वितरण व्यवस्था सध्या आदिवासी महिला व मुलींचे शिक्षण अभियान आदिवासी मित्रांचे आरोग्य या बाबत यूथ ऑफ टुडे वेलफेयर फाउंडेशनचे मार्शल नाडर, कोमल भागवत, रुतुजा कांबळे, रतुल भूनिया व त्यांचे अन्य सहकारी हे सदैव कार्यरत असतात .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम