बिहार विधानसभा निवडणुकीत प्रमोद मोरे यांच्यावर निरीक्षक पदाची जबाबदारी

शहापुर (महेश धानके) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. प्रमोदजी मोरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

यासंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व बिहार निवडणुकीच्या प्रचार समितीचे अध्यक्ष खासदार रणदीप सुरजेवाला व निमंत्रक मा.श्री. मोहनप्रकाश यांनी दूरध्वनीवरून कळविले. 


बिहार मधील ३८ जिल्ह्यातील निवडणुकी साठी देशाच्या विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून श्री. मोरे यांच्यासह राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री. विजयजी वडेट्टीवार, नामदेव उसेंडी(गडचिरोली), राजाराम पानगव्हाणे (नासिक), सुनिल शिंदे (पुणे), यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात येत आहेत. पक्षाच्या "वार रूम"च्या सूचनेनुसार या सर्व पदाधिकाऱ्यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी सदाकत आश्रम पाटणा येथील बिहार प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात उपस्थित राहावयाचे असल्याने प्रमोद मोरे आज त्याचे सहकारी सरचिटणीस रवींद्र परटोळे यांच्यासह बिहार मध्ये रवाना झाले.या जबाबदारी बद्दल श्री. मोरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्ट