गर्दी होतं नसल्याने भाजपच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांवर लहान मुलंफडणवीस होते उपस्थित
- by Adarsh Maharashtra
- Oct 18, 2020
- 1673 views
मुंगेर,१८ ऑक्टोबर :बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) लोकजन शक्ती पक्ष बाहेर पडला असून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने शुक्रवारी उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली. लोकजनशक्ती आता ‘एनडीए’त नसल्याने मोदींच्या छायाचित्रांचा वापर निवडणूक प्रचारासाठी न करण्याची ताकीद भाजपने दिली होती. त्यावर चिराग यांनी ‘मोदी माझ्या हृदयात वसतात’ असे विधान केले. मात्र चिराग यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका न करता बिहारचे मुख्यमंत्री नितीशुकमार यांना लक्ष्य बनवले. मोदींचे छायाचित्र लावण्याची खरी गरज मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आहे. त्यांनी नेहमीच मोदींचा अपमान केला, राजकीय विरोधही केला आहे, असेही चिराग म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील प्रचार दौऱ्याची सुरुवात २३ ऑक्टोबरला होत असून चार दिवसांत ते १२ प्रचारसभा घेतील. २३ व २८ ऑक्टोबर, १ व ३ नोव्हेंबर अशा चारही दिवशी मोदींच्या प्रत्येकी तीन सभा होतील.
दुसरीकडे बिहार निवडणुकीसाठी राज्यात रणधुमाळी सुरू आहे. कोरोनाकाळात जनतेपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. पण, अनेक ठिकाणी व्हर्च्युअल नाही तर मैदानातल्या जाहीर सभाही भरवल्या जात आहेत. ‘नवभारत टाईम्स’नं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंगेर जिल्ह्यात दोन सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या दोन्ही सभांमधलं चित्र परपस्पर विरोधी होतं.यातील पहिली सभा मुंगेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रणब यादव यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या सभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव आणि खासदार ललन सिंह हेदेखील उपस्थित होते. तर इथून काही किलोमीटर अंतरावर तारापूरमध्ये विरोधी नेते तेजस्वी यादव यांची सभा भरली होती.
मुंगेर शहरापासून काही अंतरावर भाजप आणि जेडीयूचे अनेक बडे नेते सहभागी झाले होते. परंतु,रॅलीला फारशी गर्दी आढळून आली नाही. जवळपास १००० लोकंही या सभेत नव्हती. मागच्या बाजुच्या खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. अनेक खुर्च्या मांडल्याही गेल्या नव्हत्या. मांडलेल्या खुर्च्यांवर मोदींचा मुखवटा घातलेली अनेक लहान मुलंही बसलेली पाहायला मिळाली.
दुसरीकडे, भाजपच्या सभेपासून ४० किलो मीटर अंतरावर तारापूरमध्ये महाआघाडीचे उमेदवारी तेजस्वी यादव मतं मागण्यासाठी दाखल झाले होते. तेजस्वी यांना पाहण्या साठी हजारोंच्या संख्येनं गर्दी जमा झाली होती. परंतु, सभेसाठी हजर झालेल्या अनेकांनी मास्क परिधान केले नव्हते. ‘सोशल डिस्टन्सिंग’चा कुठेही थांगपत्ता नव्हता. तेजस्वी यांना पाहण्यासाठी लोकांनी आसपासच्या अनेक घरांच्या छतावरदेखील गर्दी केली होती. निर्धारीत वेळेपेक्षा जवळपास दोन तास उशिरानं तेजस्वी इथं दाखल झाले. परंतु, त्यांना पाहण्यासाठी लोकांनी तळपत्या उन्हात एवढा वेळ वाटही पाहिली. सभेत दाखल झाल्यानंतर तेजस्वी यांनी १० मिनिटांचं भाषण दिलं.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम