शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहिम.

अंबरनाथ(प्रतिनिधी) : शेतकरी आणि कामगार यांच्या विरोधात केंद्र सरकारने जे धोरण स्विकारले आहे त्याच्या विरोधात  अंबरनाथ काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहिम हाती घेतली होती. तसेच राज्यभरात घेण्यात आलेल्या डिजीटल रॅलीचे थेट प्रक्षेपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने डिजीटल रॅलीचे आयोजन केले होते. त्याच अनुशंगाने अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप पाटील यांच्या वतीने सरकार विरोधात स्वाक्षरी मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेला अंबरनाथ शहरासोबत अंबरनाथ आयुध निर्माणी कारखान्यातील कामगारांनीही चांगला प्रतिसाद दिला. केंद्र शासनाच्या निती विरोधात आयुध निर्माणी कारखान्यातील कामगारांनी देखील स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेत मोठय़ा संख्येने स्वाक्षरी देत केंद्र शासनाचा निषेध केला. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील शेकडो नागरिकांनी सरकार विरोधात स्वाक्षरी देत निषेध व्यक्त केला. राज्यभरात सुरु असलेल्या डिजीटल रॅलीचेही थेट प्रक्षेपण करण्यात आले. या रॅलीतील पदाधिका-यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. केंद्र सरकार कामगार आणि शेतक-यांना हद्दपार करण्याचा प्रयत्न करित आहे. त्यांची निती ही देशविरोधातील असुन या जुलमी सरकारचा सर्व थरातुन निषेध झाला पाहिजे अशी भूमीका प्रदीप पाटील यांनी व्यक्त केली.

संबंधित पोस्ट