
भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खुले करा-मनसेची मागणी .
- by Rameshwar Gawai
- Oct 16, 2020
- 1321 views
उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर महानगर पालिकेचे भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खुले करुन द्यावे यासाठी मनसे उपजिल्हा सचिव संजय घुगे व शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांच्या समवेत या अभ्यासिकेत एम पी एस सी व यु पी एस सी तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयुक्त डाॕ. राज्या दयानिधी यांची भेट घेवुन सदर अभ्यासिका लवकरात लवकर सुरु करन्याची मागणी केली आहे .
गेल्या सात महिन्या पासून या अभ्यास केंद्राला महापालिकेने कोविड केअर सेंन्टर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासा साठी जागा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे खुप हाल होत आहेत.तसेच आता उल्हासनगर शहरातील रुग्ण संख्या बऱ्या पैकी आटोक्यात आली असून सध्या या अभ्यासिकेत एकही रुग्ण नाही. त्यामुळे ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना खुली करुन दयायला हरकत नाही अशी प्रतिक्रिया बंडू देशमुख यांनी दिली आहे .
ही अभ्यासिका महापालिकेने कोविड सेंन्टरसाठी दिल्यामुळे एम पी एस सी व यु पी एस सी तसेच इतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जागेअभावी प्रचंड हाल होत आहेत.तरी आपण या विद्यार्थ्यांना होणाऱ्या असुविधेचा विचार करुन ही अभ्यासिका तात्काळ खुली करुन दयावी असे संजय घुगे यांनी सांगितले आहे . यावेळी शहर अध्यक्ष बंडू देशमुख, शहर सचिव शालिग्राम सोनवणे, शहर उपाध्यक्ष सचिन बेंडके,मुकेश सेठपलानी तसेच मनविसे चे शहर सचिव तन्मेश देशमुख हितेश मेहरा तसेच उतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम