सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर कामगारा कडुन प्राणघातक हल्ला .

उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर शहाड येथिल सेंच्युरी रेयॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश चितलांगे हे कंपनीच्या कामाने कोर्टात जाण्याच्या तयारीत असतानाच कंपनीतील एका कामगाराने राहन्या करिता कॉर्टर न दिल्याचा राग मनात धरुन त्या कामगाराने चितलांगे यांच्या पोटावर चाकुने जबर वार केला.  तर चितलांगे याना वाचवन्या करिता गेलेले कंपनीचे सुरक्षा रक्षक बाबासाहेब घाडगे यांच्यावर सुध्दा त्या कामगाराने चाकुने हल्ला केला आहे . तर त्या कामगाराला इतर कामगारानी पकडुन पोलिसांच्या हवाली केले असुन त्याला ३०७ कलमा नुसार अटक केली आहे . 

उल्हासनगर शहाड येथे सेंच्युरी रेयॉन ही कंपनी असुन या कंपनीत अरुण जवाहरलाल मसंद हा कामगार गेल्या १६ वर्षा पासुन नोकरी करत आहे . त्याला कंपनीच्या राहत्या कॉलनी मध्ये कॉर्टर पाहिजे होते . तशी मागणी त्याने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश चितलांगे (६३) यांच्या कडे केली होती . तर काल सकाळी १२ वाजता चितलांगे हे कंपनीच्या कामा करिता कोर्टात  जायला निघाले असता कामगार अरुण मसंद हा चितलांगे यांच्या जवळ येवुन मला आता पर्यंत राहायला कॉर्टर का नाही दिले अशी विचारणा करु लागला . आणि त्याच रागात मसंद याने कमरेतुन चाकु काढुन सरळ चितलांगे यांच्या पोटावर वार केला . दरम्यान चितलांगे हे खाली पडले असता कंपनीचे सुरक्षा रक्षक  बाबासाहेब घाडगे यानी मसंद याला पकडन्याचा प्रयत्न केला असता  त्याने घाडगे यांच्यावर सुध्दा वार केले तर हा प्रकार बघुन  कंपनीतील कामगारानी  मसंद याला पकडुन पोलिसांच्या स्वाधिन केले आहे  . उल्हासनगर पोलिसानी अरुण मसंद यांच्यावर कलम ३०७ , ३२४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . तर त्याला न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयाने   चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .

संबंधित पोस्ट