उल्हासनगर शहरातील बाजारपेठा काही अटीशर्ती नुसार सुरु करा- मनसेची मागणी.

उल्हासनगर(प्रतिनिधी) :  जवळपास गेल्या  उल्हासनगर शहरातील बाजारपेठा  काही अटीशर्ती नुसार सुरु करा- मनसेची मागणी.   कोरोनाच्या पार्दुभावामुळे शहरातील बाजारपेठा नियमित  सुरू नसल्यामुळे  सर्वच व्यापाऱ्यानां मोठे  आर्थिक नुकसान झाले  आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील बाजार पेठा अटी व शर्ती  नुसार सुरु करा अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष बंडु देशमुख यानी आयुक्त डॉ . राजा दयानिधी याना निवेदनाद्वारे केली आहे . त्यानी निवेदनात म्हटले आहे की या अगोदर महापालिका प्रशासन काही अटीशर्ती नुसार बाजार पेठा  सुरू करण्याची परवानगी देत होते. परंतु सुरवातीला तर कोरोनाच्या महामारी मुळे प्रशासना कडून  फक्त अत्यावश्यक आस्थापनानांच सुरू करण्याची शासनाची परवानगी होती.नंतर  इतर व्यापाऱ्यानां सुध्दा टप्याटप्याने दुकाने उघडण्याची परवानगी दिली.परंतु सततच्या बंद मुळे शहरातील व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामाना करावा लागत आहे.

तसेच पुर्ण वेळ बाजारपेठा  सुरू नसल्यामुळे विविध दुकानात काम करणाऱ्यां कामगारांना व मजुरांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.  व त्यामुळे या कामगारांना आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालविले कठीण झाले आहे.तरी या कामगारांचा सुध्दा आपण  सहानुभूती पुर्वक विचार करावा अशी मागणी त्यानी केली आहे .

दरम्यान आता तर शासनाने हॉटेल व इतर आस्थापना पूर्ण वेळ सुरु करण्याची परवानगी दिली आहे.तसेच आता उल्हासनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुध्दा कमी झाला आहे. त्यामुळे  शहरातील सर्व बाजारपेठा काही अटीशर्ती नुसार पूर्णवेळ सुरू करण्याची परवानगी दयायला काहीच  अडचण नसावी अशी मागणी ही मनसेच्या वतीने  करण्यात आली आहे.जर व्यापाऱ्यानां ९ ते ९ दुकाने उघडण्याची परवानगी दिली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व्यापाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपल्या पध्दतीने आंदोलन करेल असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी उपजिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख, शहर सचिव शालिग्राम सोनवणे, उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश सेठपलानी, मनविसेचे तन्मेश देशमुख,हितेश मेहरा सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट