माझे कुटूंब माझी जबाबदारी. या मोहिमे अंतर्गत उल्हासनगरात आतापर्यंत ४५८२४४ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या
- by Rameshwar Gawai
- Oct 14, 2020
- 658 views
उल्हासनगर(प्रतिनिधी): राज्य शासनाने. माझे कुटूंब माझी जबाबदारी . ही मोहिम सुरु केली असुन या मोहिमे अंतर्गत शहरात कोविड चा प्रादुर्भाव कमी करन्या करिता घरो घरी जाऊन तपासण्या करण्याचे काम महापालिका करत आहे . तेव्हा आता पर्यंत १ लाख २१ हजार ८३१ घरांचे सर्वेक्षण करुन एकुण ४ लाख ५८ हजार २४४ नागरिकांच्या तपासण्या केल्याची माहीती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यानी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत माहीती देताना युवराज भदाणे यानी सांगितले की . माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमे करिता एकुण १८८ पथके तयार केली असुन या पथकात ५६४ कर्मचारी यांचा सामावेश करन्यात आला आहे . तर या पथका मध्ये १ आरोग्य कर्मचारी व स्थानिक लोक प्रतिनिधी नी दिलेले २ स्वयंसेवक असणार आहेत . दरम्यान १८८ पथका करिता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय सी एस आर निधी मधुन विविध रंगाचे १४०० टि शर्ट आणि १४०० टोप्या वाटप केल्याची माहीती आयुक्तानी दिली आहे . दरम्यान या मोहिमे करिता प्रती पथकाला आरोग्य तपासणी करिता किट ही देण्यात आल्या आहेत . तर या मोहिमे अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राना ५० हजार स्टिकर व वार्ड निहाय बॅनर्स वाटप करन्यात आले आहेत . या मोहिमेची माहीती शहरवासीयाना व्हावी म्हणुन शहरात तील २० ते २५ या मुख्य ठिकाणी होर्डिंग लावन्यात आले असुन रिक्षाद्वारे ही मायकिंग करन्यात येत आहे .
त्याच प्रमाणे नियुक्त केलेल्या पथका मार्फत दररोज ५० घराना भेटी देवुन त्या भेटी दरम्यान ऑक्सिजन लेवल तपासणी करन्यात येत आहे . तर या मोहिमे अंतर्गत आता पर्यंत शहरातील १ लाख २१ हजार ८३१ घरांचे सर्वेक्षण करन्यात आले असुन ४ लाख ५८ हजार २४४ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करन्यात आल्याची माहीती युवराज भदाणे यानी दिली आहे . त्यानी अधिक देताना सांगितले की शहरात ८३०६ मोरबाईड चे रुग्ण आढळुन आले असुन सर्दी ताप खोकला असलेले ९३२ रुग्ण मिळाले आहेत तर ९९७ रुग्णांची कोविड चाचणी केली असता ७० रुग्ण पॉझिटिव्ह मिळुन आले आहेत . दरम्यान १५/९/ २०२० ते १०/१०/२०२० या कालावधीत पहिली फेरी यशस्वी पणे पार पडली असुन आता १४/१०/२०२० ते २३/१०/२०२० या कालावधीत दुसरी फेरी सुरु होणार आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम