उल्हासनगर महापालिकेच्या ऑन लाईन महासभेत स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड,विषय समित्या लांबणीवर

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती च्या आठ सदस्यांच्या निवडी करिता घेण्यात आलेल्या ऑन लाईन महासभेत गदारोळ  झाला असुन त्याच गदारोळात आठ ही सदस्यांची निवड करुन अखेर पिठासन अधिकाऱी भगवान भालेराव यानी महासभा अनिश्चित काळा करिता पुढे ढकलली आहे . त्यामुळे विषय समितीच्या सदस्यांची निवड ही लांबणीवर पडली आहे . 

उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांचा कार्यकाल संपल्यामुळे २२ सप्टेंबर रोजी ऑन लाईन महासभा घेवुन सदर सदस्यांची निवड होणार होती . परंतु कोरम पुर्ण नसल्याचे कारण देत पिठासीन अधिकारी भगवान भालेराव यानी ती महासभा रद्द केली होती . त्यामुळे भाजपा च्या नगरसेवकानी पिठासीन अधिकाऱ्यानी लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करुन लवकरात लवकर पुन्हा ऑन लाईन महासभा घेण्याची मागणी केली होती . तेव्हा १२ ऑक्टोंबर रोजी पुन्हा ऑन लाईन महासभा घेन्यात आली .नगरसेवकानी महापालिकेच्या दालनात बसुन ही महासभा सुरु करन्यात आली . तर पिठासन अधिकारी व उपमहापौर भगवान भालेराव आणि आयुक्त डॉ .राजा  दयानिधी हे दोघे सभागृहात ऑन लाईन होते तेव्हा स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड या महासभेत करन्यात आली . अर्चना करनकाळे . राजेश वधारिया . जया माखिजा  कविता पंजाबी . राजु जग्यासी . व कांचन लुंड ( भाजपा ) तर चंद्रशेखर यादव कुलवंतसिह सोहटा ( शिवसेना ) या आठ सदस्यांची स्थायी समितीवर वर्णी लागली असुन यातील भाजपाच्या जया माखिजा यांची  स्थायी समितीच्या सभापती पदी नियुक्ती होन्याचे निश्चित झाले आहे . दरम्यान ऑन लाईन महासभेत गोंधळ सुरु झाल्याने भाजपाचे नगरसेवक प्रदिप रामचंदानी . मनोज लासी . महेश सुखरामानी यानी सभागृहात येऊन पिठासीन अधिकारी भालेराव यांच्या समोर गोंधळ घातला . याच गोंधळा मुळे भालेराव यानी सदर महासभाच रद्द केली . त्यामुळे विषय समित्याच्या सदस्यांची होणारी निवड लांबणीवर गेली आहे .

संबंधित पोस्ट