उत्तरप्रदेश च्या योगी सरकारचा हाथरसप्रकरणी मनसे कडुन निषेध .

उल्हासनगर (प्रतिनिधी) :  उत्तर प्रदेश येथील हाथरस मधील मनीषा वाल्मिकी वर झालेल्या सामूहिक पाशवी बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणात बलात्कारी नराधमांना सहकार्य करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबाला न विचारता त्यांना जीवाचा धाक दाखवून त्या पीडितेच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करणाऱ्या व लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या तसेच गेल्या महिना भरात ३ बलात्काराच्या घटना घडलेल्या उत्तर प्रदेशच्या निर्लज्ज योगी सरकारचा आणि सरकारची गुलामगिरी करीत असलेल्या पोलीस प्रशासनाचा तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनाचा  उल्हासनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला.तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना,उल्हासनगर शहर यांच्या वतीने उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना पोस्टाने बांगड्या भेट म्हणून पाठविण्यात आल्या आहेत .

या निषेध आंदोलनात  उल्हासनगर शहर संघटक मैनुद्दीन शेख,सह सचिव प्रवीण माळवे,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे,शाखा अध्यक्ष मॅक्स लोखंडे,महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा शफिया सय्यद,मीना मोरे,रेखा झा तसेच मनसेचे आणि महिला सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संबंधित पोस्ट