
उल्हासनगर शहरात ओला व सुखा कचरा अलग करण्याची प्रक्रिया कधी होणार .
- by Rameshwar Gawai
- Oct 12, 2020
- 789 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात सुरवात पासुनच कचऱ्याची समस्या गंभीर असुन कचरा टाकायला डंपिंग सुध्दा बरोबर नाही तर शहरात ओला कचरा व सुखा कचरा अलग करन्याची प्रक्रिया कधी सुरु होणार यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे .उल्हासनगर शहरात दोन डंपिंग ग्राऊंड असुन एक डंपिंग पुर्ण पणे भरल्याने कचरा हा कॅंप न . ५ येथील डंपिंग वर टाकन्यात येतो . परंतु ओला कचरा व सुखा कचरा अलग करत नसल्याने त्या कचऱ्यातुन दुर्गंधी पसरत असल्याने स्थानिक नागरिकाना त्या डंपिंग चा त्रास होत आहे . दरम्यान नागरिक सुध्दा ओला कचरा व सुखा कचरा अलग न करता सर्व कचरा एकत्र करुनच टाकत असल्याने या कचऱ्यातुन दुर्गंधी सुटत असते परंतु उल्हासनगर महापालिका क्षेत्रात ओला व सुखा कचरा अलग करन्याची प्रक्रिया बंद पडल्याने ही समस्या उभी ठाकली आहे .
उल्हासनगर येथिल दूकाने व कारखाने यातुन निघणारा सुख कचरा हा डंपिंग ग्राउंड वर फेंकण्यात येतो त्याचा काही ही उपयोग होत नाही. देशातील इतर महापालिके प्रमाणे उल्हासनगर महापालिका ही देखिल पैसे मिळवु शकते . कारण ओला कचऱ्यातुन खाद आणि सूख्या कचऱ्याला रिसाइकिल करुन त्यातुन इतर उत्पादन करु शकते . तर त्यामुळे महापालिकेला करोडो रुपयाचे उत्पन्न मिळु शकते . दरम्यान उल्हासनगर महापालिके द्वारे उसाटने गाव येथे मिळालेल्या ३० एकर जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ही राबवणार असल्याची घोषणा सुध्दा मध्यंतरी झाली आहे . परंतु जो पर्यंत नागरिक दुकानदार कारखानदार याना ओला कचरा व सुखा कचरा अलग करन्याची सवय लागत नाही तो पर्यंत ही कचऱ्याची समस्या सुटणार नाही . तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यानी घन कचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार ओला कचरा व सुखा कचरा प्रत्येक घरातुन अलग करन्याच्या प्रक्रियेला २०१८ मध्ये सुरवात केली होती तेव्हा निळे व हिरवे या दोन रंगाचे डब्बे यांचा वाटप सुध्दा केला होता . परंतु ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम