उल्हासनगरातील आर टी पी सीआर लँब उद्घाटनास कोणाची प्रतिक्षा

उल्हासनगर (प्रतिनिधी) :  शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने  कोरोना संशयितांच्या स्वॅबची चाचणी तातडीने होण्यासाठी स्वतंत्र आर टी पी सी आर लँब म्हणजे चाचणी निदान केंद्र लवकरच सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, कोरोना संपत आला तरी या प्रयोग शाळेच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडेनासा झाला आहे .

उल्हासनगर महापालिका  शहरात एकीकडे व्यापारी व नागरिकांना अँटीजेन चाचण्यांचा आग्रह धरत आहे . तर दुसरीकडे ४० ते ४५ लाख रुपयांंचे स्थापत्य व दिड कोटींच्या अमेरिकेतील थर्माफिशर कंपनीच्या अत्याधुनिक मशिन्स असणाऱ्या या निदानकेंद्रात रोज १००० रुग्णांच्या स्वँब नमुन्यांची चाचणी होऊ शकणारी लँब तयार असुनही महापालिका  तिचे लोकार्पण का  करत नाही. 

या कोविड काळात कोरोना चाचणी करीता महापालिकेस मेट्रोपाँलिस व मुंबईच्या खासगी प्रयोगशाळांं वर अवलंबून राहावे लागत होते. आता तातडीने संशयित कोरोना रुग्णांच्या स्वँब चाचण्या होऊन अहवाल मिळणे, कोरोना रुग्णावर  उपचार करणे व संसर्ग रोखण्या

साठी प्रशासनास सोपे जावे यासाठी ही प्रयोगशाळा उभी राहत आहे .कोविड - १९ रिअल टाईम पध्दतीच्या या चाचणीद्वारे कोविड आहे की नाही याचे ४८ तासातच निदान शक्य होईल. शहाड स्टेशन पुर्व जवळील कोणार्क रेसिडेंन्सी येथील स्वतंत्र प्रयोग शाळा तातडीने सुरू होईल असे वाटले होते. मात्र उद्घाटनासाठी

कुण्या एका बड्या मंत्र्यांची या लँबला वाट पहावी लागत असल्याचे समजते . त्यामुळे  जनतेत रोष पसरत आहे.

प्रतिक्रिया : शहरातील सत्ताधारी शिवसेनेची संवेदनशीलता हरवली आहे. लँब तातडीने सुरु करण्यापेक्षा नेते मंडळीना बोलावून उद्घाटन करणे व फोटोसेशन करण्याच्या नादात यांनी जनतेच्या जिवाशी खेळ मांडलाय. नेत्यांना वेळ नसेल तर महापौरांनी लोकार्पण करून तात्काळ ही लँब कार्यान्वित करायला हवी. अन्यथा  या सरकार व प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्हालाचप्रतिकात्मक उद्घाटन करावं लागेल. - प्रदिप रामचंदानी,नगरसेवक व  भाजपा नेते,उल्हासनगर

या लँबचे बांधकाम पुर्ण झाले असुन तांत्रिक बाबी अपुर्ण आहेत. त्याची पुर्तता होताच लँबचे लोकार्पण करण्यात येईल".- युवराज भदाणे, जनसंपर्क अधिकारी . महापालिका

संबंधित पोस्ट