उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती करिता सोमवारी होणार ऑनलाईन महासभा

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांच्या निवडी करिता सोमवारी ऑन लाईन महासभा होणार आहे . तर भाजपाचे बहुमत असल्याने त्यांचाच स्थायी समिती सभापती होन्याची शक्यता नाकारता येत नाही . 

उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती मधील आठ सदस्यांचा कार्यकाल संपला आहे . तेव्हा या आठ सदस्यांच्या निवडी करिता २२ सप्टेंबर रोजी झुम ॲप वर महासभेचे आयोजन केले होते परंतु कोरम पुर्ण नसल्याचे कारण देत उपमहापौर तथा पिठासन अधिकारी भगवान भालेराव यानी ती महासभा रद्द केली होती . परंतु पुन्हा सदर ऑन लाईन महासभा सोमवारी झुप ॲप वर होत आहे . दरम्यान स्थायी समिती मध्ये भाजपा कडे बहुमत आहे . तर शिवसेना व टिम ओमी कलानी यांचे संख्याबळ कमी आहे . तेव्हा भाजपाला  महापौर निवडणुकीत टिम ओमी कलानी यानी दगा दिला होता.  तोच वचपा भाजपा काढणार की नाही हे या महासभेत ठरणार आहे . त्यातच पुन्हा कोरम अथवा ऑन लाईन मध्ये काही गडबड झाली तर महासभा पुढे ढकलन्याची ही शक्यता आहे . जर महासभा झालीच तर भाजपाचा स्थायी समिती सभापती होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

संबंधित पोस्ट