उल्हासनगरातील पंजाबी कॉलनी रस्त्यावर खड्डेच खड्डे. नागरिक त्रस्त .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरातील खड्डे बुजवन्यासाठी स्थायी समिति मध्ये दि . १४ मे रोजी    ठराव क्रमांक ६७ हा मंजुर झाला आहे . या ठरावात शहरातील खड्डे बुजवन्या करिता निधी मंजुर करन्यात आला आहे . या ठरावात  पंजाबी कॉलनीचा रस्ता देखिल असुन  या रस्त्यावरील खड्डे पावसा पुर्वी बुजवन्यात येतील असे आश्वासन महापालिकेने दिले होते . परंतु आता पावसाळा संपत आला आहे तरी पण पंजाबी कॉलनी येथिल रस्त्यावरील खड्डे अद्याप पर्यंत बुजवले नाही . त्यामुळे येथिल नागतिक परेशान झाले आहेत . म्हणुन या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवन्यात यावेत अशी मागणी दलित पॅंथर ऑफ इंडीयाचे जिल्हा  अध्यक्ष कैलास साबळे यानी महापालिका आयुक्त याना केली आहे . दरम्यान शहरातील अद्याप ही रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत फक्त खड्ड्यात माती टाकुन खड्डे बुजवन्याचा प्रयत्न होत आहे पण ती माती खड्ड्यात राहत नाही त्यामुळे खड्डे पुन्हा पडत आहेत . पंजाबी कॉलनी येथे खड्डेच खड्डे पडल्याने नागरिकाना चालताना तारेवरील कसरत करावी लागत आहे . म्हणुन महापालिकेने रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर  बुजवन्यात यावे अशी मागणी दलित पॅंथर ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष कैलास साबळे यानी केली असुन खड्डे बुजवले  नाहीत तर आंदोलनाचा ही इशारा त्यानी दिला आहे .

संबंधित पोस्ट