
उल्हासनगरात महाराष्ट्र सरकारचा मंदिर बंदीचा मोगलाई आदेश झुगारून मनसेने मंदिरात जाऊन घेतले देवदर्शन.
- by Rameshwar Gawai
- Oct 07, 2020
- 999 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : १६ व्या शतकात संपूर्ण भारतात मोगलाई माजलेली असतांना महाराष्ट्रात छत्रपती महाराजांनी अठरा-पगड जातींच्या मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. हा इतिहास सर्वश्रुत आहे,
आता महाराष्ट्रात दारूची दुकाने,बियर बार उघडण्याची परवानगी हे सरकार देत आहे. परंतु सर्वसामान्यांच्या आस्थेचा प्रश्न असलेल्या मंदिरे उघडण्यासाठी हे सरकार कोणताही निर्णय घेत नसल्याने काल मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या कडवट आणि कट्टर अशा अठरा-पगड जातीच्या मनसैनिकांनी उपजिल्हा सचिव संजय घुगे,मैनुद्दीन शेख यांच्या नेतृत्वात उल्हासनगर -१ येथील या मोगलाई माजवत असलेल्या राज्य सरकारचा मोगलाई आदेश झुगारून मंदिरात जाऊन आरती केली. आणि सर्वसामान्य जनतेसाठी मंदिरे उघडे करण्याची सरकारकडे मागणी केली.
यावेळी उपजिल्हा सचिव संजय घुगे,शहर संघटक मैनुद्दीन शेख,सहसचिव प्रवीण माळवे,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे, सुहास बनसोडे,अनिल गोधडे, उपविभाग अध्यक्ष विक्रम दुधसाखरे,मुकेश चव्हाण, शाखा अध्यक्ष अमित सिंग,मनिष मोरे,सुनील खेडगीकर तसेच मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम